कोविड-१९ जागतिक महामारीच्या काळात अनेक व्यक्तींनी कोविड योद्धा म्हणून काम केले. त्यात मुख्य म्हणजे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शिक्षक या सारख्या अनेक व्यक्ती व संस्थांनी काम केले.
आमच्या जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावांमध्ये भुसावळ तालुक्यातील कोरणा च्या हॉटस्पॉट ठरले होते. अनेक गल्ली मध्ये कोरोना चे पेशंट होते. आणि त्यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे तर मुख्य काम पाहत होते व त्यांच्या सोबतीला प्रतिबंध क्षेत्रांमध्ये नजर ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्याच बरोबर शिक्षक विविध अधिकारी यांनी काम पाहिले. त्यामुळे ही सर्व टीम वर्क असून सगळ्यांनी सोबत काम पाहिले. त्यामुळे सर्वांचा सहभाग यामुळे आपण कोविड १९ या जागतिक महामारी चा सामना करत आहोत .अशाच प्रकारे आपण कार्य केलं.
आमच्या गावातील नवीन नियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रिया बोंबटकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वेळोवेळी कोरोना तपासण्याचे कॅंप आयोजित करून जनजागृती केली. अशा महिला आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक संपूर्ण गावभर करण्यात आले. व ते मी जवळून पाहिले आहे.[*शिक्षण विभाग जि प जळगाव*
*Wattpad (social story telling platform) निबंध स्पर्धा*
*विद्यार्थी नाव* - तेजस किरण गांधेले
*इयत्ता* -८वी (अ)
*शाळा* -राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे (पानाचे), तालुका:भुसावळ
*विषय* - "मी अनुभवलेला कोविड योद्धा "
*मार्गदर्शक शिक्षक नाव* - श्री योगेश गांधेले सर
*मार्गदर्शक मुख्याध्यापक*- श्री डी डी पाटील सर
*मार्गदर्शक अधिकारी* -श्री तुषार प्रधान साहेब
गटशिक्षणाधिकारी भुसावळ]
YOU ARE READING
मी अनुभवलेला कोविड योद्धा
Short Storyनाव:तेजस किरण गांधेले वर्ग: ८वी शाळा: राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव शिक्षण विभाग जळगाव. तालुका: भुसावळ