.............कसे असते की नाही मित्रांनो आपण रोज सकाळी उठतो रोज रात्री झोपतो. पण की नाही त्यांच्यातला फरक फक्त एवढाच असतो आपण झोपतो तेव्हा स्वप्न बघतो. आणि उठतो तेव्हा पूर्ण करण्याच्या विश्वासाने , आपल्यातल्या असणाऱ्या आत्मविश्वासाने ,आपल्या जिद्दीने. आसचा असते प्रत्येक नव्या वर्षाचे वर्षाची सुरुवात आपण एका नव्या स्वप्नाने करतो .
नवे वर्ष म्हणजे नवा आशा, नव्या आकांक्षा, नवी स्वप्न, नवे संकल्प, नव्या ओळखी, नवी भरारी मारण्याचे वर्ष. अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा घेऊन नव्या वर्षाचा सूर्योदय होत असतो. नव्या वर्षांत आनंद वाटायचा असतो. दुःख, निराशा विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी नववर्षानिमित्ताने आपल्याला मिळत असते. या नव्या वर्षाची सुरुवात उत्तमोत्तम संदेश पाठवून आपण करू शकतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी-भेटी होत नसल्या, तरी मित्रांना, नातेवाइकांना, आप्तेष्टांना नववर्ष स्वागताचे संदेश पाठवून त्यांच्याबद्दलच्या आठवणींना नक्कीच उजाळा देऊ शकतो.
चला या नवीन वर्षाचं
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलवुया,
सरत्या वर्षात झालेल्या चुका
विसरून जाण्याचा प्रयत्न करूया,
नवीन वर्षात नवे संकल्प करूया,
आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे धाडस करूया .तसेच होते 2020 सालाचे जगातील प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षाच्या नवीन स्वप्नांना साकार करू लागला पण चंद्राला ग्रहण लागते तसे कोरोना सारखी महामारी एखाद्या वाऱ्याप्रमाणे सगळीकडे पसरली आणि जगाला आपल्या फेऱ्यात अडकवले आणि सगळ्यांच्या स्वप्नांचा कचराच करून टाकला त्यातच काहींच्या नोकऱ्या गेल्या,मुलांचे शिक्षण थांबले परंतु सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच ठेवलें पण त्यासाठी देखील
मोबाईल ,लॅपटॉप ,इंटरनेट ची गरज होती सगळ्यांजवल ते उपलब्ध न्हवते.. असो
माझे मत मांडायचे तर ......गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल,
मला असे वाटते की 2021 साल खूप आनंदायी जाओ लोकांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो .. 2020 वीस साली
झाले देशाचे सर्व आर्थिक नुकसान भरून येईल थोडा कालावधी लागेल पण शक्य आहे अशक्य तर नाही .. फक्त जाता जाता येवढच सांगेन की या वर्षाला खूप आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा आणि ..
खरं तर 2020 साल खूप अविस्मरणीय राहणार नक्कीच ना ........
तसेच जर का सगळे पाहिले सारखे सुरळीत करायचे असेल तर तर नियमित मास्क वापरा, कोणत्याही वस्तूला हात लावायचा अगोदर सैनी टायझर वापरा , दोन व्यक्तीनं मध्ये सुरक्षित अंतर ठेवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या .. ह्या सर्व गोष्टींचे नियमित पालन करा आणि corana सारख्या महामारीवर एकतेने मात करा ..
Jai Hind..
Jai Bharat..✍️✍️✍️......
....
YOU ARE READING
निबंध
Short Story2020 सळमधील माझे अनुभव आणि येणारे 2021 साल अधिक होण्यासाठी च्या माझ्या कल्पना