' मोलमजुरी चे पोट
घरी बसून भरेना
उभा ठाके यज्ञप्रश्न
कधी जाईल कोरोणा'
कोरोना जगातील चर्चेतील विषय .हा एक छोटासा विषाणू पण त्याने जगाला घरात बंद केले आहे .2019 च्या डिसेंबरअखेर चीनमध्ये हा रोग आला आणि मार्च अखेरपर्यंत पूर्ण जगात त्याने धमाकुळ घातला व मार्च एप्रिल पासून आत्तापर्यंत lockdown, quarantine, home quarantine,mask, sanitizer हे शब्द आपले मित्र-मैत्रीण बनले व social distance हा एक नियम.
Lockdown मुळे सर्व वाहतूक बंद होती. रेल्वे ,हवाई उड्डाणेही बंद होती. त्यामुळे निसर्गावर याचा चांगलाच परिणाम झाला व पावसाच्या प्रमाणात वाढ झाली. भारत हा कृषिप्रधान देश व त्यात जास्त पाऊस यामुळे शेतकऱ्यांकडून जास्त प्रतिसाद मिळाला म्हणजेच देशावरील अन्नधान्याचे मोठे संकट टळले .
Lockdown मुळे शाळा, बाजारपेठा, मंदिरे सर्व काही बंद होते .याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर तसेच अनेकांचा रोजगारावरही झाला.देवमाणूस म्हणून आपल्याला मदत करणारे अनेक डॉक्टर्स, नर्स,पोलिस, सफाई कर्मचारी इत्यादी लोक मदत कार्यासाठी उभा राहिली. 2020 हा कालखंड संपला. या काळात अनेक जणांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आणि त्यांचे मनोबलही खचले. पण सुरेश भट म्हणतात-
"विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही"हे लक्षात घेता आपल्याला प्रयत्न करायला हवा .जसे आपल्याला सांगता येईल software कंपनीने work from home चालू केले तसेच शिक्षण कार्यात online शिक्षण चालू झाले पण तरीही या काळात मुलांचे खूपच नुकसान झाले. Online शिक्षण ofline इतके प्रभावी नव्हतेच. मोठ्या पदवीधारांनी अनेक निर्णय घेतली. शिक्षण क्षेत्रातील प्रगती ही उद्याची गरज आहे. आता मुलांना व्यावहारिक ज्ञान द्यायला हवे. काल्पनिकतेवर विश्वास ठेवण्यापेक्षा वस्तुनिष्ठवर विश्वास ठेवला पाहिजे हे मुलांना शिकवायला हवे. जेव्हा मुले प्रत्यक्ष त्याला अनुभवतील, त्याचा विचार करतील तेव्हाच ते आयुष्यात यश मिळवू शकतील.
कोरोनाने तर मुलांचे खेळणे तर बंदच केले होते . त्यावर एका चिमुकलीची कविता अजूनही मला आठवते -
' कोरोणामुळे रे मी खेळू शकत नाही बाहेर
कारण कोरोणा आहे आजाराचे माहेर'
माणसाला भविष्याचा वेध घेण्याची खूप इच्छा असते.तसेच तो आपल्या भूतकाळात अनेकदा डोकतो .पण लक्षात ठेवा -' भूतकाळ हा अनुभव
वर्तमान हा एक प्रयोग तर
भविष्य ह्या आपल्या अपेक्षा
आपण आपला अनुभव घेऊन प्रयोग केला पाहिजे ज्यामुळे आपल्याला लागणाऱ्या गोष्टीची प्राप्ती झाली पाहिजे'.