होय चावीच...
त्या फ्लॅटची चावी अतुलला खुणावत होती.
एका क्षणाचाही विलंब न करता त्याने ती चावी उचलली."विनाशकाले विपरीत बुद्धी"..
अतुलला काहीच गरज नव्हती त्या फ्लॅटचे रहस्य जाणून घेण्याची.
पण माणसाला उगाच नसत्या भानगडीत पडण्याची खाज असते ना.
अतुल तरी कुठे अपवाद होता.तो जीपवाला काही लगेच येणार नाही.
बघू तरी या घरात काय आहे?
अशा उत्सुकतेपोटी अतुलने चावी उचलली.
आणि कुलूपाला लावली.
हे करत असताना त्याचे हृदय एका वेगळ्याच ऊर्जेने धडधडत होते.
आपण काहीतरी अद्वितीय आणि धाडसी काम करत आहोत अशा वेगळ्याच धुंदीत अतुलने थरथरत्या हाताने ते कुलुप उघडले.त्याला माहितही नव्हते की हे उघडलेले दार त्याच्यासाठी सुदैव आणणार की दुर्दैव.
पण डोक्यावर सी आय डी बनण्याचे भूत सवार होते.गडबडीत स्वतःचा फ्लॅट लॉक करायचे पण तो विसरून गेला.
मघाशी खाली जाताना त्याने दरवाजा नुसताच ओढून घेतलेला होता.
हे तो पूर्णतः विसरला होता.एका वेगळ्याच उत्साहाने अतुलने त्या संशयित घरात प्रवेश केला.
आत शिरताच लगेचच घरातल्या त्या वासामुळे त्याने नाकावर हात ठेवला.
उजेडातून आल्यामुळे आधी तर त्याला घरातले काहीच दिसत नव्हते.
आणि त्यात त्या घरात असलेला अंधार.
त्यामुळे लाईट लावण्याशिवाय पर्याय नव्हता.इकडे तिकडे पाहीले तर नशिब दाराजवळच नेहेमी असतो तसा एक स्विच बोर्ड होता.
सगळे स्विच फटाफट ऑन केले.
फक्त एक डीम लाईट सुरू झाला.
त्या मंद प्रकाशात तो बऱ्यापैकी हॉल मधला नजारा बघू शकत होता.तिथल्या कोणत्याच वस्तूला तो स्पर्श करणार नव्हता.
हॉल मध्ये टीव्ही, सोफा, शोकेस, टेबल अशा सर्व वस्तू होत्या.
अतुल सावध पवित्र्याने पुढे पुढे जाऊ लागला.म्या आ आ आ आ आ ऊ..
बोक्या आडवा आला.
तो या नव्या माणसाकडे कुतुहलाने बघत गुरगुरत होता.
अतुलने त्याची पर्वा केली नाही.
तो पुढे चालतच राहिला.
उजव्या बाजूला एक बेडरूम होते.
तिथे उजेड होता.
अतुलने ओझरते पाहीले तर त्या ठिकाणी सिंगल बेड, कपाट अशाच सर्व वस्तू होत्या.
आणि दोन-तीन मोठ्या धान्य साठवायच्या कोठ्या होत्या.
पॅसेज मधून पुढे जाताच किचन होते.
आणि किचनच्या मागे होते अजून एक बेडरूम.
BẠN ĐANG ĐỌC
ट्रॅप ✔️
Bí ẩn / Giật gânअतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि...