५.

2K 13 7
                                    

पण आज अतुलचे कामात बिलकुल लक्ष लागत नव्हते.
प्रियाची मूर्ती सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होती.
त्याने तिला खूप नीट बघितले नव्हते तरी त्याला ती खूप आवडली होती.
मध्यम उंची, रंगाने गोरीपान, धारधार नाक, धनुष्यासारखे ओठ आणि लगेच हातात पकडावीशी वाटेल अशी मस्त लांब हनुवटी.

बस मग अतुलने ठरवून टाकले.
आईची सेवा करण्यासाठी एकदम परफेक्ट मुलगी त्याला मिळाली होती.
प्रियासोबत स्वतःच्या लग्नाची स्वप्ने रंगवायला त्याने सुरुवात केली.
प्रियाला आपले बनवायचेच असा पक्का निर्धार आज त्याने करून टाकला.

कधी एकदा रात्र पार होते आणि घरी जाऊन तो प्रियाला भेटतो असे त्याला झाले होते.
प्रियाच्या वडिलांचे मन जिंकायचे बस इतकेच त्याला करावे लागणार होते.
अतुलची गावाकडे भरपूर मोठी हायवे-टच जागा होती जीची किंमत आजच्या घडीला चार-पाच करोडच्या आसपास होती.
ही त्याची वडिलोपार्जित संपत्ती होती.
आईला इकडे आणले की तो कोकण कायमस्वरुपी सोडणार होता.
अर्थातच ती जागा विकून शहरातच एक सुंदरसे घर घ्यायचे आणि आयुष्यभर आई, पत्नी आणि मुलेबाळे यांसोबत छान चैनीचे जीवन जगायचे हे त्याचे स्वप्न होते.
काही वर्ष नोकरी करून उरलेले आयुष्य फक्त आरामशीर जगायचे असा सरळ सोपा त्याचा हिशेब होता.

तर एकंदरीत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या, मॅनेजरच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या आणि शिवाय करोडोंच्या जमिनीचा एकुलता एक वारस असलेल्या अतुलला जावई म्हणून कोणत्याच बापाने नाकारले नसते.
प्रियाचे वडीलही त्याला अपवाद नव्हते.
त्यामुळे अतुल खूप खूप आनंदी होता.
पण आधी त्याला प्रियाचे मन जिंकायचे होते.

मनात स्वप्नांचे मनोरे रचले जात होते आणि घड्याळाचे काटे भरभर फिरत होते.
ड्युटी संपवून अतुल घरी आला.
आज पायऱ्या चढताना त्याला बिलकुल झोप किंवा थकवा जाणवत नव्हता.
नेहेमीपेक्षा जास्त ऊर्जा अचानक कुठूनतरी आली होती.

प्रियाच्या घराला कुलूप लागायला अवकाश होता.
अतुलने ब्रश, आंघोळ, धूपबत्ती इ. नित्यकर्म आटोपली.
साडेनऊ वाजण्याची तो मोठ्या उत्साहाने वाट बघत होता.
हॉलमध्ये बसून सगळे लक्ष समोरच्या दारावर केंद्रीत केले होते.
तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि अतुलचे हृदय जोरजोरात धडधडू लागले.
प्रियाच्या वडिलांनी बाहेरून कुलूप लावले.
त्यांची जीप सुरू झाल्याचा आणि ती गेल्याचा आवाजही त्याने ऐकला.

ट्रॅप ✔️Where stories live. Discover now