६.

1.9K 6 6
                                    

"अय्या!!!
मोबाईल फोन?
माझ्यासाठी?"

असे म्हणत बॉक्स मधुन चमचम करणारा तो फोन प्रियाने बाहेर काढला.
तिचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
तिने अतुलला मिठीच मारली.

प्रिया: ए, मी स्वप्न तर नाही पहातेय ना?

असे प्रियाने म्हणताच अतुलने तिच्या उघड्या दंडाला हळूच चिमटा काढला.
त्याने पाहिले की एका सेकंदात तिचा दंड लाल झाला.

प्रिया: आऊच.
किती जोरात चिमटा काढलास.
समजले समजले.
स्वप्न नाहीये हे.
(अतुलकडे लटक्या रागाने बघत ती दंड चोळत होती.)

प्रियाने तो फोन उलट-सुलट करून खूप वेळा कौतुकाने बघितला.

अतुलजवळ चेहरा नेऊन त्याच्या गालावर हलकेसे ओठ टेकवून तिने त्याला थँक्यू म्हटले.
अतुलसोबत तिची ओळख अगदी ताजीच असताना तिचे असे वागणे खरे तर योग्य नव्हते.

आणि इकडे अतुलच्या संयमाची सुद्धा खरी परीक्षा होती.

प्रियाला करकचून मिठी मारावी आणि तिच्या गुलाबी ओठांना चावून त्यांना अजून लाली आणावी यासाठी त्याचे शरीर आणि मन दोन्हीही व्याकूळ होत होते.

पण नाही.
प्रियाच्या हृदयापर्यंत जाणाऱ्या गडाची आत्ता तर कुठे पहिली पायरी तो चढला होता.
त्याला हा गड शक्तीने नाही तर युक्तीने जिंकायचा होता.
आणि मग तिथे कायम त्याचेच राज्य असणार होते.

वस्तुतः हा हँडसेट अतुलने स्वतःकरता मागवला होता.
पण प्रिया आणि त्याच्यात संबंध मजबूत करण्यासाठी त्याला तिच्या सतत संपर्कात राहणे गरजेचे होते.
म्हणून त्याने हा फोन तिला काहीच विचार न करता गिफ्ट करून टाकला.
त्याच्याकडे असलेले जिओचे एक्स्ट्रा सिम त्या फोनमध्ये टाकले.
आता अतुल आणि प्रिया एकमेकांच्या सतत संपर्कात राहू शकणार होते.
आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट होणार होती.
अतुलला लवकरात लवकर प्रियाला आपले बनवायचे होते.
तिला मिठीत घेण्यासाठी तो उतावळा झाला होता.
पण प्रियाच्याही मनात त्याच्यासाठी तिच ओढ निर्माण झालेली त्याला पहायची होती.
आणि त्यासाठी वेळ लागणार होता.

ट्रॅप ✔️Where stories live. Discover now