अप्रतिम!!!
लाजवाब!!!(खरेतर अतुलला हॉट किंवा सेक्सी असे शब्द वापरायचे होते पण जीभ उचलत नव्हती.)
म्हणजे ना, तुझे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत पियु.
मी फार लकी आहे तुझ्यासारखी अप्सरा माझी पत्नी होणार!हे बोलताना अतुलची नजर सतत प्रियाच्या उघड्या पायांकडे जात होती.
पण त्याच्या संस्कारांमुळे तो कोणतेच चुकीचे कृत्य करण्यास धजावत नव्हता.
स्वतःचे लक्ष विचलित व्हावे म्हणून त्याने प्रियाला दोघांसाठी कॉफी बनवायला सांगितली.प्रियाला काहीच सुचत नव्हते.
स्वयंपाकघरात अगदी नवखी असल्यासारखी ती वागत होती.
अतुलला या गोष्टीचे जरा नवलच वाटले.
पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.अतुल: पियु तू टेंशन घेऊ नकोस.
तुझेच घर समज.
आणि तू या घरात पूर्ण सुरक्षित आहेस.
तुझी संमती असल्याशिवाय मी तुझ्या नखाला सुद्धा स्पर्श करणार नाही.अतुलचे बोलणे ऐकून प्रिया गालातल्या गालात हसली.
इकडे अतुलला खूपच जास्त शिंका येऊ लागल्या होत्या.
त्याला सायनसचा त्रास होता.
पाऊस किंवा गार हवेत हा त्रास कायम वाढत असे.अतुल फोनमध्ये काहीतरी बघत प्रियापासून लक्ष विचलित करत होता.
प्रियाने कॉफीचा कप त्याच्या पुढे केला.
आणि स्वतःपण कप घेऊन सावधगिरीने खुर्चीवर बसली.अतुल एकेक घोट कॉफी पीत होता.
प्रियाने कप तोंडाला लावताच भुर्रकन कॉफी बाहेर उडवली.
आणि तोंड वेडेवाकडे केले.प्रिया: अतुल, अरे कॉफी कित्ती कडू झाली आहे!!!
तू मला बोलला पण नाहीस.
आय एम सॉरी.
मी याआधी कधी बनवली नव्हती रे कॉफी.अतुल: अगं ठीक आहे ना.
नको चिंता करुस.
शिकशिल सगळे हळूहळू.
तू मला काही गोष्टी शिकव आणि मीही तुला शिकवेन थोडेफार काहीतरी.अतुलने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले.
प्रियाने कॉफीचा कप सिंकमध्ये उलटा केला.
अतुल तिच्याकडे बघत हसत होता.

YOU ARE READING
ट्रॅप ✔️
Mystery / Thrillerअतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि...