प्रियाचे वडील अतुलचा प्रश्न ऐकून ताडकन उभे राहिले.
अतुल: हे बघा..
मी स्वतःच पुढाकार घेतला म्हणून तुम्ही चिडू नका.
माझे वडील हयात नाहीत.
बोलणी करायला घरात कोणीही मोठं माणूस नाही.
आई आहे पण ती गावाकडेच असते.
तीही सारखी लग्न कर म्हणून मागे लागली आहे.
कारण ती पण आता खूप थकली आहे.
सून आली की गावाकडची सगळी इस्टेट विकून शहरातच बंगला बांधून तिथेच राहू असे तिचे स्वप्न आहे.
आणि माझी नोकरीही चांगल्या पगाराची आहे.
तुमच्या प्रियाला मी खरंच खूप सुखात ठेवेन.
तुम्ही हवा तितका वेळ घ्या.
विचार करा.
नंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.
मला तुमचा निर्णय मान्य असेल.अतुलचा इतका आत्मविश्वास बघून प्रिया एखाद्या मूर्ती सारखी स्तब्ध झाली होती.
दादा अतुलवर खूप भडकणार आणि आता मोठ्ठा राडा होणार या भीतीने तिच्या पोटात गोळा आला होता.पण तसे काहीच झाले नाही.
प्रियाचे वडील काहीच न बोलता तिथून शांततेत निघून गेले.
आणि प्रियाला ही डोळ्यांनीच खुणावून येण्याची सूचना केली.
प्रियाच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त भाव होते.
ती वडिलांच्या पाठोपाठ लगेच निघून गेली.अतुलला आता त्याच्या बोलण्याचा पश्र्चाताप होऊ लागला.
आपण उगाच घाई केली की काय असे वाटू लागले.
पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द परत घेता येत नाहीत.
त्यामुळे आता होतील ते परिणाम भोगण्यासाठी अतुल तयार होता.काही मिनिटातच अतुलला प्रियाचा मॅसेज आला.
"दादा चक्क शांत आहेत.. आणि मला विचारत होते की अतुल तुला आवडतो का म्हणून?"आणि या मॅसेज पुढे खूप साऱ्या ब्लशच्या इमोजीज तिने पाठवल्या होत्या.
ते वाचून अतुल मनातल्या मनात खूप खुश होत होता.
त्याचा तीर अचूक निशाण्यावर लागला होता.अतुल: मग तू काय उत्तर दिलेस?
प्रियाने परत इमोजितले डोळे झाकलेले माकड रिप्लाय म्हणून पाठवले.
YOU ARE READING
ट्रॅप ✔️
Mystery / Thrillerअतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि...