११.

2.1K 12 2
                                    

गुरुजींच्या म्हणण्यानुसार सध्या तुम्हा दोघांच्या लग्नाचा योग नाही.

अतुल ताडकन उठून उभा राहिला.

अतुल: अरे असे कसे काय नाही?
त्यांना नीट पंचांग बघा म्हणावं.

अतुल नाराजीने म्हणाला.

सुरेश: ग्रहदशा चांगली नाही असे म्हणाले गुरुजी.

अतुल: माझा या कोणत्याच गोष्टींवर विश्वास नाही.
तुम्ही माझी जन्मतारीख वगैरे विचारलीत तेव्हाच मी बोलणार होतो की फक्त शुभ दिवस निवडला तरी खूप आहे.
आता विनाकारण ग्रहमान आडवे येईल बघा.
आज माझा मित्र येतोय.
माझ्या सख्ख्या भावाहून अधिक आहे मला तो.
तो आला की तो नक्कीच काहीतरी योग्य मार्ग सुचवेल.

सुरेश: ठीक आहे.
तुम्ही नव्या पिढीची पोरं.
तुम्ही काय योग्य ते ठरवा.
माझी काहीच हरकत नसेल.
जेवणावर नाराज नका होऊ.
जेवण करून घ्या.

अतुलने मुक्यानेच जेवण केले.
आणि प्रियाशी सुद्धा काहीच न बोलता निघून गेला.

सुरेश: पोरी हे सगळं तू नंतर आवर..
जा अतुलरावांना सांग की त्यांच्या मनासारखे होईल..
नका नाराज होऊ म्हणावं..
समजावून सांग त्यांना..
जा लवकर..

वडिलांच्या सांगण्यानुसार प्रिया अतुलकडे गेली.
दार उघडताना पण त्याचा मूड काही चांगला नव्हता.

प्रिया: स्वारी खूपच रुसलीये!!!
इतकी घाई झाली आहे लग्नाची?
हां?

अतुल: का तुला नाहीये घाई?
तू तर आपला हनिमून प्लॅन करत होतीस ना काल रात्री?

प्रिया: (लाजत..) हो हो..
मला पण आहे घाई..
आणि दादांना सुद्धा..

अतुल: काय?
आणि ते गुरुजींचं पंचांग?

प्रिया: दादा म्हणाले की अतुलराव सांगतील तेव्हा लग्न करू?

अतुल: हम्म.. ठीक आहे..

प्रिया: काय हम्म.. तुला आनंद नाही झाला?

अतुल: तुला जोपर्यंत मिठीत घेत नाही तोपर्यंत आनंद नाही होणार मला..

ट्रॅप ✔️Where stories live. Discover now