मॉन्स्ट्रोसिटी - भाग 3

484 2 0
                                    

मॉन्स्ट्रोसिटी च्या मागील भागात आपण वाचलंत -

डेव्हिडची टोळी वाईन पिऊन झोपी गेल्यानंतर रॉबर्ट झोप येत नसल्याने मध्यरात्री उठुन इमारतीची सैर करायला निघतो आणि इमारतीत असलेल्या एका केबीनमध्ये पाठमोरी बसलेल्या आकृतीकडे चालत जात स्वत:चा प्राण गमाऊन बसतो. त्याच्या मित्रांना याची किंचीतही कल्पना नसते. ते अजुनही बेसावधच असतात.

आता पुढे -

दुसरा दिवस उजाडला. कडाक्याच्या थंडीत इमारतीच्या बाहेर बर्फ़ाचे वादळ अजून चालूच होते. वेगाने वाहत असलेल्या बर्फ़ाळ वाऱ्याचा घुंघुंघुं आवाज संपूर्ण इमारतीमध्ये घुमत होता. इकडे मोनिका जागी झाली. सकाळी उठताच आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने मोबाईल हातात घेतला. नेटवर्क कालपासून डाऊन दाखवत होते. आता कॉल तर दूरच पण साधे इंटरनेट सुद्धा वापरता येणार नाही या कल्पनेनेच तिचा मूड ऑफ झाला.

ती मोबाईल आपल्या हाताने उंच धरत नेटवर्क येते का पाहत खोलीबाहेर असलेल्या पॅसेज मध्ये आली. तिच्या चालण्याच्या आवाजाने हॉलमधील गरम सोफ्यात झोपलेला जेम्स डोळे चोळत बाहेर आला.

जेम्स, तुझ्या मोबाईल मध्ये नेटवर्क येतेय का? - मोनिका

नाही गं.. कालपासून माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा नेटवर्क येत नाहीये. जोपर्यंत हे बर्फ़ाचे वादळ थांबत नाही तोपर्यंत तरी नेटवर्क मिळणे कठीणच आहे. - जेम्स जांभया देत स्वतःचा मोबाईल चेक करत म्हणाला.

या दोघांच्या बोलण्याचा आवाज आल्याने इकडे अरोमा पण झोपेतून जागी झाली. आळस देत ती आपल्या पलीकडे पाहू लागली. रॉबर्ट तिथे नव्हता. डोळे चोळत ती सुद्धा रूमच्या बाहेर आली.

Hey friends, रॉबर्ट कुठेय?
- अरोमा दोघांना विचारू लागली.

मी नाही पाहिले त्याला काल रात्रीपासून..
- मोनिका

हो.. मी सुद्धा नाही पाहिले त्याला कालपासून..
कमाल आहे, काल तर इतका दंगा करत होता,
आता सकाळी सकाळी कुठे गेला तो हुंदडायला?? - जेम्स भिंतीला टेकत म्हणाला.

मॉन्स्ट्रोसिटीDonde viven las historias. Descúbrelo ahora