TLJ ४| श्वास माझा होशील का? | ४

161 0 0
                                    


आयुष रुपाली ला घेऊन त्यांच्या रूम मध्ये आला... तिला बेडवर झोपवतो आणि तीच bp वगैरे चेक करतो, काही वेळाने रुपाली ला शुद्ध येते..

"रुप्स... काय झालं... " रुपालीच अजून हि डोकं गरगरत होत.

"खाल्लं नव्हतंस का नीट ... मला वाटते तू कामाचा खूप ताण करून घेतलस... "

रुपाली च्या कानावर आयुष चे बोलणे पडत होते पण तिला समजत काहीच नव्हते... तिला अचानक ते डोळे आठवतात... ती आयुष चा हाथ धरते आणि त्याला मिठी मारते... "आयुष ते डोळे... तो माणूस... तो कोण होता?"

"कोण माणूस? कोणा बद्दल बोलतेस..."

"आपल्या पार्टीत आलेला तो... त्याने मास्क घातलेला... "

"मला काही कळत नाही आहे रुप्स... कोणाबद्दल बोलतेस... "

"चल वर चल... मी दाखवते... "

"नाही आधी तू काही खाऊन घे, आराम कर जरा वेळ... तुझं बीप वाढलंय किती."

"नाही नाही... तो निघून गेला तर... "

रुपाली त्याच काही नाही ऐकत आणि त्याला वर घेऊन जाते पण वर बराच वेळ शोधल्यावर हि तिला कोणी दिसत नाही, रुपाली च्या खांद्यावर थाप पडल्याने ती वळून बघते, शिवानी तिच्या मागे उभी होती...

"काय ग रुप्स कुठे होतीस इतका वेळ... " रुपाली आपला झालेला गोंधळ बाजूला ठेवत, मूड बदलायचा प्रयत्न करत तिला म्हणते....

"वाहिनी... काय दिसतेस आज तू ... आज तर दादा च काही खरं नाही... "

शिवानी तिच्या पाठीत एक धप्पा देत म्हणते.. "ते सर्व ठीक आहे, काय झालं? कोणाला शोधतेस इतकी कावरी बावरी होऊन?"

"काही नाही... " रुपाली ची नजर अजून हि भिरभिरत होती त्या व्यक्ती ला शोधत होती .. शिवानी तिला परत परत विचारते तेव्हा रुपाली तिला घेऊन खाली जाते आणि मग तीच्या मनात सुरु असलेले सर्व सांगते. सर्व ऐकून शिवानी डोक्याला हाथ मारून घेते...

"रुप्स... एक स्वप्न होते ते इतके का मनावर घेत आहेस... आणि तू त्याचा इतका विचार करत आहेस म्हणून तुला भास होत आहेत कि ती व्यक्ती इथे पार्टीत आली आहे वगैरे... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora