ओंकार ला हॉस्पिटल मध्ये तातडीने डॉक्टर तपासतात, बाकी सर्व बाहेर उभे असतात. पीटर सारखा फेऱ्या मारत होता. आयुष आणि रुपाली पीटर ला एका बाकावर बसायला सांगतात... "हे बघ पीटर ... तुझा मित्र बारा होईल, पण मला ना अजून हि इतके प्रश्न पडलेत, ओंकार काव्या ला कसे ओळखतो?"
पीटर हसू लागतो... कधी आयुष कडे तर कधी रुपाली कडे बघून. दोघांचा गोंधळ उडाला होता. "अरे असं हसतोस काय आता... "
"साहेब... तुमची हि आतुरता, हे प्रेम काव्या साठीची तळमळ... मला साठवून घेऊ द्या ना... खूपच छान वाटतंय बघा कोणाचा इतका जीव असू शकतो कोणावर हे बघून... "
आयुष त्याला प्लिज पुढे सांग असे बघतो... "काही एक मला वाटते १.५ वर्ष झाले त्या घटनेला... ओंकार आपल्या नवीन बुलेटवर पुण्याला चालला होता, तसं तो आपल्या धुंदीतच होता... कालच साखरपुडा उरकला होता ना त्याचा त्यामुळे आनंद कुठे व्यक्त करू असे झाले होते त्याला... पण बहुतेक नशिबात वेगळेच काही होते... त्याच्या नशिबात माझे येणे लिहिले होते, आमची गाठ पडणं लिहिलं होतं ... त्याच्या गाडीचा ऍक्सीडेन्ट झाला आणि ऍक्सीडेन्ट खूपच भयानक झाला होता, त्याला डोक्याला हि खूप मार लागला होता. त्या ऍक्सीडेन्ट मध्ये ओंकार जवळ जवळ गेल्यातच जमा होता, फक्त दिवस मोजण्याचं काम उरलं होतं, त्याच हृदय कमकुवत झालं होतं आणि फक्त २०% काम करत होत... पण तुम्ही देव बनून त्याच्या आयुष्यात आलात आणि परत जीवनदान मिळले..."
आयुष आणि रुपाली एक दुसऱ्याला बघू लागले... त्यांनी ओंकार ला पहिल्यांदाच पहिले होते मग त्याला जीवनदान देण्याचा प्रश्नच उरत नव्हता... तरी ते पीटर पुढे काय म्हणतोय ते ऐकतात...
"काव्या ... काव्या चे तुम्ही हृदय दान केलं होत ना... ते मॅच झालं ओंकार ला आणि ओंकार परत बरा झाला... तुम्ही काव्या च्या निर्णयाचा मान ठेवला नसता तर आज ओंकार जिवंत नसता... " बोलता बोलता पीटर च्या डोळ्यात पाणी आले...तसे आयुष आणि रुपाली धक्क्यात होते...
"म्हणजे... ओंकार च्या शरीरात आता काव्या चे हृदय आहे??" पीटर आपले डोळे पुसत हो असे म्हणतो... आयुष ला विश्वास बसत नव्हता... ज्या निर्णयाचा त्याने इतक्या प्रखरपणे विरोध केला होता त्या निर्णयाने आज एक जीव वाचला होता... आयुष रुपाली कडे थक्क होऊन बघत होता, रुपाली च्या चाऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.

YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...