TLJ ४| श्वास माझा होशील का? | ३४

18 0 0
                                    


आनंद आणि आरोही दोघे हि एकमेकांशी ह्या विषयावर काही बोलत नाही, खरं तर आरोही नि अर्धवट बोलणं ऐकले होते, तिनी फक्त एवढेच ऐकले कि आनंद ला शिवानी आवडू लागली आणि त्याला आपल्या भावना तिला सांगायच्या पण त्या पुढे जेव्हा अनंत नि त्याची उलट तपासणी केली तेव्हा आनंद नि त्यांना दिलेले उत्तर तिनी ऐकले नव्हते, ऐकले असते तर तिला हे हि कळले असते कि आनंद आरोही वर किती प्रेम करतो आणि ह्या परिस्थितीत अडकल्यामुळे त्याची काय अवस्था होत आहे.

अशाच विचारांमध्ये, काय करावे काय नाही, काय ठीक, सर्वांसाठी काय चांगले राहील ह्यामध्येच २-३ दिवस निघून गेले. शेवटी आरोही नि आपला निर्णय घेतला होता, आनंद च्या मनात सुरु असलेले द्वंद्व ती बघू शकत नव्हती. शेवटी तिनी हि आनंद वर प्रेम केले होते, आणि जर आनंद तिच्या सोबत सुखी राहणार नाही तर त्याला आपल्या सोबत जबरदस्ती बांधून ठेवण्यात तिला काही अर्थ वाटत नव्हता, फक्त जग काय म्हणेल, लोक हसतील ह्या विचारांनी ती आनंद चे सुख हिरावून नव्हती घेऊ शकत. तिचे सुख त्यांच्या सुखात होते, मग भले ते शिवानी सोबत का असेना, संसार लोकांसाठी नाही तर त्या दोघांना एकमेकांसाठी करायचा होता. पण तिच्या ह्या निर्णयात एक अडचण होती आणि ती म्हणजे रणजित, ती जरी तयार होती आनंद पासून लांब जायला काय रणजित शिवानी ला लांब जाऊ देईल? त्यामुळे आरोही आपला निर्णय घेण्याआधी एकदा रणजित शी बोलयचे ठरवते.

अनंत हि ते दिवस काळजीत होते, आनंद नि त्यांना सांगितल्यापासून ते बैचैन होते, अंकिताशी बोलून मोकळं हि होता येत नव्हते कारण त्या त्यांच्यापेक्षा जास्ती काळजी करतील आणि त्यातून काही मिळणार नव्हते, ह्या परिस्थितीतून आनंद ला कसे बाहेर काढावे, त्याला कसं समजावे त्यांना काही कळेना...

आपल्या खोलीत ते फेऱ्या मारत होते, अंकिता पासून त्यांची हि बेचैनी काही झाकली गेली नव्हती, त्या खोलीत येतात तेव्हा अनंत जाऊन खुर्चीत बसतात, अंकिता त्यांच्या हालचाली कडे लक्ष देऊनच होत्या,

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora