रुपाली ला सर्व कळल्यावर तिचे चित्त काही थाऱ्यावर राहत नाही, काय करावे काही कळत नाही, आनंद ला दुखवू शकत नव्हती आणि शिवानी ला सांगू शकत नव्हती, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी काही परिस्थिती झाली होती तिची. त्यामुळे बराच विचार करून ती रणजित ला सांगायचे ठरवते. इतकी मोठी गोष्ट न सांगून ती रणजित चा विश्वास नव्हती तोडू शकत. त्यामुळे ती लगेच रणजित ला गाठते आणि त्याला सर्व काही सांगते. रणजित सर्व ऐकूण थक्क राहतो, पण त्याच वेळेस त्याला आपले भान हरवून हि चालणार नव्हते, आत्ताशी फक्त आनंद च्या मनातले कळले होते पण शिवानी ला त्याच्या बद्दल काय वाटते कळले नव्हते. रणजित रुपाली ला मी बघतो काय करायचे असे म्हणून शांत राह म्हणतो.
"दादा... तू शांत कसे राहू शकतोस... तुला कळतंय का ह्याचा किती परिणाम होणार आहे... "
"हे बघ रुपाली, मी ह्या आधी हि तुला सांगितले आहे, नेहमी आपण काही निर्णय घेतलाच पाहिजे असे नसते, आधी सर्व बाजू तपासून बघू दे. शिवानी चे मत काय मला जाणून घेऊ दे, उगाच कशात काही नसतांना मी मनावर घेऊन काही भलतेच केले तर?"
"दादा... पण वाहिनी कडून हि तसे असेलच ना... नाही तर कसे दादा ला वाटलं असतं..."
"रुपाली तू फार बोलतेस... लहान आहेस माझ्या पेक्षा हे लक्षात ठेव... मी बघतो म्हणालो ना... जा तू आता... " रणजित तिला खडसावत आपल्या खोलीत निघून जातो, शिवानी ध्रुव ला झोपवत होती, रणजित ला संतापलेले बघून ती इशाऱ्याने काय झाले विचारते तर रणजित मान हलवत काही नाही असे सांगतो.
ध्रुव ला झोपवून शिवानी येते, रणजित शांतच बसला असतो...
"काय झालं रे?"
"कुठे काय?"
"मग, लाल का झालं आहे नाक?"
रणजित नाकाला हात लावून शेंड्या कडे बघत म्हणतो... "नाही... मला तर नाही दिसत आहे लाल झालेलं... तूच डोळे चेक कर तुझे... " रणजित आपल्या बोलण्यात थोडं हसू आणत म्हणाला...
शिवानी मानेच्या नसा चोळत असते, रणजित जवळ जात काय झाले विचारतो... "आज खूप काम झालं, आणि त्यात आज आनंद नव्हते ना ऑफिस ला मग सर्व मलाच बघावं लागलं... "

YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...