TLJ ४| श्वास माझा होशील का? | ४१

22 0 0
                                    


आयुष आणि रुपाली घरच्या सर्वांना जमवतात, सकाळी सकाळी काय झाले आता म्हणून सर्व जमतात. आयुष कडे सर्वांच्या नजारा टिकल्या होत्या, "मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे..."

सर्व विचार असे त्याला बघत होते, "तुम्ही सर्वांनी माझे दुसरे लग्न का लावून दिले? मी काय एकटा आनंदी नसतो का राहू शकलो... ??"

आयुष चे वाक्य ऐकून अनंत आणि अंकिता काळजीने रुपाली कडे बघतात, "काय झालं रुपाली? भांडला का हा तुझ्याशी?" रुपाली मान हलवत नाही असे म्हणते.

"इकडे इकडे बघा... माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या... " त्याला प्रत्येक जण आपली बाजू समजावून सांगत होता...

आयुष सर्वांच्या तोंडून कारणे वदवून घेत होता... सर्वानी सांगितल्यावर तो म्हणतो... " म्हणजे तुम्हाला सर्वांना वाटते मी दुसरे लग्न करून चांगले केले ना... "

सर्व एका सुरत हो म्हणतात, "मग समजा माझ्या सोबत जे झालं ते मी चाळीशीत असतांना झाले असते तर? काय तुम्हाला तेव्हा हि असे वाटेल कि मी परत लग्न करावे..."

आयुष चा प्रश्न ऐकून अनंत चिडतात, "अरे हा काय पोरकटपणा लावला आहेस आयुष... आणि रुपाली तू हि त्याची साथ देत आहेस, काय चाललंय?"

"सॉरी बाबा, पण पोरकटपणा नाही, आयुष ला खूप महत्वाचे बोलायचे आहे, तुम्ही सर्व प्लिज त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना... "

त्यावर सर्व परत हो काही हरकत नाही परत लग्न करायला असे म्हणतात, "म्हणजे मी चाळीशीत दुसरे लग्न केले तर चालेल..... मग काय तुम्हाला दीक्षित काका नि आता ह्या वयात परत लग्न केले तर चालेल?... "

त्या प्रश्नावर सर्व शांत झाले.. "अरे आता मी केलं तर चालेल न तुम्हाला मग आता काय झालं?"

सर्व आता अनंत कडे बघत होते, अनंत काय म्हणणार ह्याची सर्वांना प्रतीक्षा होती, अनंत काही विचार करत होते, आयुष हि अनंत कडे टक लावून बघत होता, सर्वांना आपल्याकडे असे बघताना बघून अनंत त्यांना म्हणतात, "अरे तुम्ही तुमचे तुमचे मत सांगा ना... मला काय वाटते ते मी सांगेन नंतर... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Onde histórias criam vida. Descubra agora