हास्याचे गुलगुले उडवणारी ही हास्यभयकथा वाचकांचे मन नक्कीच जिंकेल.
-------------"मसनावळीत काम मिळालंय राव तुम्हाला, काय भ्या बी वाटतं का नाही?" रतांडवाडा गावातील चावडीवर बसलेल्या चारचौघांपैकी एकानं विचारलं.
तसा रघुनाथही तंबाखू मळत मोठ्या तावाणे
"भ्या? आरं म्या रातच्यालाच जन्माला आलेलं इटाळ आहु. भुतंबितं आसतील तरी पायाखाली तुडवीत काढीन मसनावळीतून." असं म्हणत तंबाखू ओठांआड ठेवून चघळू लागला.
आता कोरूना नावाचा रोग आल्यापासनं दहा रुपयांची तंबाख चाळीशला मिळायची त्यामुळे गावातील अक्कड बक्कड पुढारीच लपून छपून चुना लावतांना आढळायचे त्यात हा एक रघुनाथशेठ ऐपत दाखवायचा. तशी त्याची ऐपत पन्नास पैशांची चुनापुडी घ्यायची नव्हती पण मसनावळीत काम मिळाल्यापासनं आपोआपच 'रघ्या' चा रघुनाथशेठ झाला होता.वयाची चाळीशी उलटल्यानंतर रघुनाथला कशीबशी एक नोकरी मिळाली. आता मला नोकरी मिळाली असा गाजावाजा तो स्वतःच गावात मिरवत फिरायचा पण गावकर्यांना ती नोकरी नाही शिक्षा वाटायची. मसनावळीत काम म्हणजे आला मूडदयांशी संबंध. त्यांच्यासाठी खड्डा ओकरने, पेटव्याचे असल्यास फाट्या गोळा करणे, दिवसा अन रातच्यालाही तिथेच मुक्कामी राहणे असली कामे मोक्कार पैकं दिलं तरी गावातील कोणी करणार नव्हतं.
पण रघुनाथशेठ ने महिना तीन हजार रुपयात पाटलांसमोर मसनावळीत काम करायला मान हलवली.
तसं रातच्याला तिथं थांबायचे काय काम आहे. भुतं राखायला का? असा प्रश्न बहुतेक चतुर पतूर लोकांना पडू शकतो. पण ते असं असतं की रातच्याला पुरलेल्या मूडदयांच्या कबरी कुत्री ओकरतात अन बाहेर काढून त्यांच्याबरोबर टाईमपास करतात. म्हणून रातच्याची डीवटी करावी लागायची.
रघुनाथशेठ जरी दिवसा सत्तावन इंची छाती वर करून मिशांवर पीळ मारायचा तरी रात्री मसनावळीतील छोटयाशा घरात गुमान पांघरूनं घेऊन खसडायचा. पांघरूनाने पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत अंग झाकल्यावर आता भुताला मी दिसणार नाही असं वाटून घेऊन निवांत झोपायचा.
YOU ARE READING
Default Title - Write Your Own
Horrorमसनावळ एक हास्यभयकथा. वाचाल तर वाचतच राहाल. निराळा अनुभव आणि कधीही न वाचलेला घटना या कथेत दाबून भरलेल्या आहे. Lets start reading...