मैत्रिणीचा साखरपुडा

2.5K 13 11
                                    



     आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमाला जाणार होते . संध्याकाळी तीनच्या दरम्यान कार्यक्रम चालू होणार होता . मला आमंत्रण एक आठवडा आधी दिलं होत . आता आज तिच्यासाठी वेळ काढला होता . खूप भारी वाटत होत आज तिचा साखरपुडा होता . अक्षता माझी कॉलेज ची मैत्रीण . आम्ही एकमेकींशिवाय कधी कोणता कार्यक्रम नाही केला . तर मग आज तिच्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम मी कसा जाऊ देईन .
       दुपारचं जेवण आटोपून मी माझ्या तयारीला लागले . छान फ्रेश होऊन आले.  अक्षाताच्या साखरपुड्याची खास शॉपिंग केली होती आम्ही दोघींनी मिळून . दोघींनीही फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला होता . तिच्यासाठी लेहंगा आणि माझ्यासाठी पंजाबी सूट . खूप छान वाटत होता तो ड्रेस मला. मी छान तयार झाले . ड्रेस वर शोभतील असे कानातले रिंग , बांगड्या , खड्याची टिकली आणि हलका मेक अप . गळ्यात नाजूक असा छोटासा नेकलेस . केसांना पिळ देऊन त्यांना क्लिप लावला होता . बाकी केस मोकळे सोडले होते . सगळी तयारी झाल्यावर मी एकदा स्वतःला आरशात बघितल आणि बघतच राहिले.  अचानक काहीतरी आठवल आणि भानावर आले .

    मी निघाले . आधीपासून कल्पना होतीच खूप पाव्हणे असणारेत . त्यात मला उशीर झाला होता . अक्षता माझी वाट बघत होती . मी माझी गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि कार्यक्रमाच्या दिशेने वळले . मी हॉल मध्ये प्रवेश करताच सगळे माझ्याकडे बघू लागले . मला ते जाणवत होत . मी पटापट पावल उचलत अक्षता पर्यंत जाऊन पोचले . अक्षाताच्या प्रश्नांचा पाऊस पडायला सुरुवात झाली होती . तिला मध्ये तोडत मी म्हणाले खूप सुंदर दिसतेय . आणि दोघींनी एकमेकींना मिठी मारली .

       आता मी स्टेज वरून खाली उतरले आणि एका खुर्चीत जाऊन बसले . अक्षाताला सोडलं तर ओळखीचं कोणी नव्हतं . तरीही कोणीतरी ओळखीचं भेटेल या आशेने मी हॉलभर नजर फिरवत होते . अचानक कोणाला तरी बघितल्या सारखं वाटलं आणि मी परत मागे वळून बघितलं . मनाला खात्री पटली हो तो तोच आहे . तो आकाशच होता .  आज खूप वर्षांनी तो मला दिसला . आजही तो तसाच होता . शांत पण चेहऱ्यावर हसू नाही . आधीही असच होता हसला तर नेमकच जीवावरच . जणू काय हसायला पैसेच पडतात. आज इतक्या वर्षानंतरही तो तितकाच सुंदर दिसत होता . काळया रंगाचा शर्ट त्यावर हलक्या निळ्या रंगाची फॉर्मल पँट . त्याचा कलर गोरा असल्यामुळे या कपड्यांमध्ये तो अजूनच सुंदर दिसत होता.
      मी त्याच्याकडे बघतच राहिले . कदाचित त्याला कळलं असावं कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे . त्याने माझ्याकडे बघितल आणि मी लगेच नजर चोरली. मी शांतपणे दुसरीकडे बघू लागले . मनात भीती होती तो जवळ आला तर पण वेळसुद्दा माझ्या बरोबर होती . मला समोर माझा मानलेला भाऊ दिसला . हो प्रेमच होता तो . मी प्रेमला हाक मारली तसा तो लगेच माझ्याजवळ आला . खूप दिवसांनी भेटलो होतो आम्ही . खूप गप्पा मारल्या दोघांनी . गप्पा मारत असताना माझं लक्ष मात्र आकाश कडे होत . पण हे सगळं लपून छपून होत होत . आता मी आकाश ला बघतेय हे प्रेमला माहीत होते . कारण तो प्रेमच होता ज्याला माहित होत मी आकाशला आणि आकाश मला खूप आधी पासून लाईक करतो . पण आम्हा दोघांमध्येही बोलायची हिंमत नव्हती.  मनात कुठेतरी भीती होती मन तुटले तर . मी विचारात होते आणि अचानक तो समोरून दिसेना झाला .
      तो कुठे गेला असेल म्हणून मी इकडे तिकडे बघू लागले . तेवढ्यात त्याने येऊन प्रेमला हाक दिली. प्रेम सुद्धा आता त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला . दोघे गप्पा करत बसले . आता मी वेळ घालवावा म्हणून माझ्या मोबाईल मध्ये काहीतरी करू लागले . माझी नजर जरी मोबाईल मध्ये असली तरी लक्ष मात्र आकाशाकडे च होत . आम्ही दोघंही एकमेकांना चोरून बघत होतो . मध्येच नजरेला नजर मिळाली की स्वतःच स्वतःशी हसत होतो. 
        कार्यक्रम उरकला होता . सगळी माणसं जेवायच्या तयारीत होती . पण आम्हाला कुठे कसलं भान होत . आम्ही आमच्यात गुंग होतो . एकमेकाला बघण्यात भूक मेली होती . डोळ्यांच्या इशाऱ्यात खूप काही बोलून जात होतो . आता नजर हटवायला ना तो तयार होता ना मी . तेवढ्यात अक्षताच्या मम्मीने मला हाक मारली . आणि आमची तंद्री तुटली . मला जेवायला बोलवत होत्या . नाईलाजाने मला जावं लागलं .
      जेवायला तर आले पण मूड नव्हता . कारण आता समोर तो नव्हता . मनातून वाटत होत तो येईल माझ्याबरोबर जेवायला . पण तो कुठेच नव्हता . आता पत्रावळी मध्ये एक एक पदार्थ वाढला जात होता.  पण माझा लक्ष जेवणापेक्षा जास्त आकाशाकडे होता .  तोच कुठे दिसत नव्हता . मी माझ्याच विचारात होते . अचानक जाणवलं कोणीतरी समोर उभे आहे . पण जेवण वाढत नाहीये . मी समोर बघितले तर आकाश पुरीच भांड घेऊन उभा होता.  त्याला बघून मला खूप भारी वाटलं . त्याने मला विचारलं पुरी देऊ का . मी मानेनेच हो म्हटलं . त्याने पुरी वाढली आणि तसाच तिथेच उभा राहून माझ्याकडे बघत राहिला.  आम्ही दोघं असेच एकमेकांना बघत राहिलो. आजूबाजूच्या सगळ्यांना विसरून आम्ही आमच्याच विश्वात होतो . सगळे आमच्याकडे बघत होते . ही गोष्ट प्रेमाच्या लक्षात येताच त्याने आकाशला  आवाज दिला . आम्ही भानावर आलो . आकाश लगेच तिथून निघून गेला . आता त्याला इथे येण्यासाठी कारण मिळत नव्हते म्हणून की काय तो कॅमेरा घेऊन आला आणि जेवणार्यांचे फोटो घेऊ लागला .
         सगळ्यांची जेवण उरकले होती . कार्यक्रम संपला होता.  प्रत्येकजण आपल्या घरी जात होता . मी पण अक्षता ला भेटून निघत होते . तेवढ्यात आक्षताच्या मम्मीने आकाशला आवाज दिला . आकाश समोर येऊन थांबला .
आक्षताच्या मम्मीने फॅमिली फोटो साठी आकाशला बोलावले होते . पण मग मला कळत नव्हते आकाशला का बोलावलं तो कोण आहे यांचा . कारण मला तर माहीतच नव्हतं आकाश नक्की कोणाचा पाहुणा म्हणून आलाय .
आता मला कळले होते आकाश आणि अक्षता दोघं भावंड आहेत ते . मला जेव्हा हे कळाल तेव्हा तर कसतरी व्हायला लागलं . कारण आजपर्यंत आकाशच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट मी अक्षता ला सांगत आले होते . या घट्ट मैत्रीत कधी हे जाणून घेता आलच नाही माझा आकाश आणि तिचा भाऊ रोहित दोघं एकच आहेत .
        आता माझी तारांबळ उडाली होती . आता सगळ काही डोळ्यासमोर येत होत आल्यापासून त्याला चोरून बघण , जेवायला वाढताना आमचं एकमेकात हरवून जाणं .  हृदयाची धकधक वाढली होती कोणीतरी आता आम्हाला नक्कीच येऊन सूनवणारे . मी कोणाचाही लक्ष नाहीये याची खात्री करून घेतली आणि हळूच बाहेरची वाट पकडली . मागून आवाज आला सूनबाई कुठे चाललात . मी आवाजाच्या दिशेने मागे वळले तर तिथे अक्षताची मम्मी होती . त्या माझ्या दिशेनेच येत आहेत हे कळले . पुढे मला स्टेज वर घेऊन जाऊन सगळ्यांनी मला सांगितले . सगळ्यांना माहीत होते मी आकाशला लाईक करते . आणि अक्षातला जेव्हा मी अकाशचा फोटो दाखवला ती सुद्धा शांत राहिली . घरी येऊन सगळ्यांना सांगितलं . तेव्हापासून आतापर्यंत हे सगळं गुपित म्हणून सांभाळलं . इकडे तर मला आनंद होत होता.  ज्याला मी आपल मानलं मनापासून प्रेम केलं तोच माझा जीवनसाथी बनणार होता . आणि दुसरीकडे मला लाजल्यासारख होत होत की सगळे आपली मज्जा घेत होते .  आम्ही सगळ्यांनी मिळून फॅमिली फोटो काढले . सगळं वातावरण आनंदी होत.  आजचा दिवस खूप भारी होता माझ्यासाठी. 

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jun 07, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मैत्रिणीचा साखरपुडाWhere stories live. Discover now