अनोखा तुटता तारा🌠

31 3 0
                                    

कालच्या जोरदार पावसानंतर वातावरणात एकप्रकारचा संथपणा होता.वाऱ्याची झुळूक शांतपणे झाडाच्या पानांना स्पर्श करत होती.झाडांची पाने त्यात हळूवारपणे सळसळत होती . सूर्य चमकत होता . त्याच्या प्रकाशाने सर्वत्र प्रकाशमान झाले होते . अगदी झाडाच्या पानांनी सुद्धा निरनिराळ्या प्रकारा छटाचा शृंगार केला होता .🌿🍂🍂🍁

जमिनीवर पहावे तर पावसामुळे पाण्याचे छोटे - छोटे डबके साचले होते आणि त्या इवल्याशा डबक्याने आकाशाचे प्रतिरूप धारण केले होते

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

जमिनीवर पहावे तर पावसामुळे पाण्याचे छोटे - छोटे डबके साचले होते आणि त्या इवल्याशा डबक्याने आकाशाचे प्रतिरूप धारण केले होते . वरती पहावे तर क्षितिजापर्यंत मांडलेले नीलमय आकाश शिवाय त्यात कापसाप्रमाणे पिंजलेले पांढरे शुभ्र ढग ते तर शांततेचे प्रतिक असतात ना !

पण अचानक वातावरणाने वेगळाच मोड घेतला.पांढरे शुभ्र ढग सैरावैरा धावू लागले आणि काळ्याभोर ढगांचे त्या ठिकाणी आगमन झाले.संथपणे वाहणाऱ्या वाऱ्यानी विजेचा वेग घेतला , झाडे वाऱ्याच्या दिशेने झुकू लागली.वातावरणाचा रंगच पालटला , प्रकाशाने नटलेल्या बहुरंगाना नजरच लागली ; त्याठिकाणी काळ्याभोर रंगांनी थैमान मांडले .

वातावरणाचा रंगच पालटला , प्रकाशाने नटलेल्या बहुरंगाना नजरच लागली ; त्याठिकाणी काळ्याभोर रंगांनी थैमान मांडले

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

नक्षत्रातल्या लाखो ताऱ्यामधून अजून एका ताऱ्याची भरती झाली . Sitara अनंतात विलीन झाली.त्या नवीन ताऱ्याचे विस्थापन होत असताना , त्याच जागेवर दुसऱ्या ताऱ्याचे प्रस्थापनही झाले . तो तारा स्थायिक होऊन चकाकला आणि तुटत्या ताऱ्याने तेजमय होऊन सर्वांना लाखो आशीर्वाद दिले .

I will repay my deathWhere stories live. Discover now