आज संध्याकाळी एक अविस्मरणीय प्रसंग घडला,तो असा की............
एका कोमेजलेला झाडाला, अचानक वसंताची चाहूल लागावी;त्याचप्रमाणे ते छोटेसं कोंब जगाला लपूनच पाहत होतं, त्याला डोळे उघडायची जणू भितीच वाटत होती; जसे नवजात बालकाचा पहिला श्वास आणि त्यातून उमगलेला त्याचा ध्यास.
ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. तेच तर होतं, जे मला अन्य व्यक्तींपासून अनोखे बनवत होते.जे मी कधी स्वप्नातही पाहिलं नाही त्या गोष्टी माझ्या आयुष्यात नव्याने घडून येत होत्या. मला एक जादुई आयुष्य प्रदान करत होत्या. एक नवीन उमेद जागवत होत्या. माझं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं ते एक छोटेसे स्वप्न पण माझ्या आयुष्यात वादळ आणण्यापेक्षा कमीही नव्हते ते!समुद्रात उसळणाऱ्या लाटांपेक्षाही भव्य, नयनभावुक दृश्य;पण कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी न करणारं.ते चुकीच्या हेतून नव्हेच.
ते तर सर्वांना एक नवीन संदेश देऊ पाहत होत, त्याला एक वेगळच जादूई आकर्षण बनायचं होत. एकदम एका छोट्याशा काजव्याप्रमाणे जो थोडा टीमटीमणारा पण क्षणार्ध आनंद देऊन जाणारा! एक नवीन उमेद उमटवणार,असं होतं हे माझं स्वप्न!............... क्षणार्धात पाहिलेलं पण आयुष्यभर जपण्यासारखा हेवा नेहमीच हवाहवासा वाटणारा जणू काही हिरेतारकांचा मेळा! तो तर माझ्या हृदयाचा ठोकाच होता.
तर नेमकं काय घडलं ते तर पाहू.........
दुपारची वेळ होती, मी पुस्तक वाचत बसले होते. आई शाळेतून दमून आली होती. माझं मन त्या पुस्तकात रमलं होतं आणि अचानक दार वाजले, मनात चटकन विचार आला;असे अवेळी कोण आले असेल?? पण कोण जाणे देवदूतच होती ती "श्रेया" माझ्या मैत्रिणीची छोटी बहिण,वडिलांच्या आज्ञेनुसार ती स्वतःचे काम बजवायला आली होती.मी तिचे स्वागत केले. तिचा थोडासा पाहुणचार केला, तिची माझ्या घरी यायची ही पहिलीच वेळ; ती खूपच लाजत होती. त्यामुळे तिने माझ्या व तिच्या लाजाळूपणाचा मान राखत, थोडासा पाहुणचार केला.
YOU ARE READING
Everything happens for a reason...
Short StoryA unique experience that unknowingly teaches a lot and provides a way to live in the direction of dreams