ब्लॅक इन गोवा भाग- ४

4.6K 15 9
                                    

गोवा का इतका आवडतो? ह्याचे उत्तर शोधायची गरज नाही. ते आपोआप आपल्याला सापडते. इथला निसर्ग, इथलं साधसुधं जीवन, शहरातील गोंगाटा पासून दूर अशा शांत वातावरणात कोणाला नाही आवडणार. गोव्याच्या दोन बाजू आहेत. समुद्रकिनारी जल्लोषाचं वातावरण तर इथल्या ग्रामीण भागात रुजलेलं शांत निवांतपण. दोन्ही भागातील समाजजीवन अतिशय भिन्न आहे. पण या दोन्हीचा समतोल इथल्या नागरिकांनी राखलाय. नेहा आणि केतकी यांना हे गावपण अगदी नाविन्यपूर्ण वाटत होतं. गावे असले तरी गोव्याने पाश्चिमात्य जीवनशैली जवळून पाहिली आहे. त्यामुळे साहजिकच मुंबई, पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांना परदेशात आल्यासारखे वाटत असे.

सकाळी सकाळीच ह्या दोन महामया गोव्याच्या समुद्राचा आनंद लूटण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. जोपर्यंत सौरभ कुलकर्णीचा परत एकदा संपर्क होत नाही तो पर्यंत त्यांच्याकडे रिकामटेकडा वेळ होता. त्यामुळेच त्यांनी अक्खा गोवा पिंजून काढायचे ठरवले. पण ह्यावेळेस त्यांनी आपल्या देखण्या एंटायसरला आराम दिला आणि हॉटेल मॅनेजर सांगून भटकण्यासाठी एक स्कुटी भाड्याने घेतली होती.

स्कुटीची सवारी थेट अंजुना बीच कडे रवाना झाली. आजूबाजूला असलेली उंच उंच नारळाची झाडे, हिरवाकंच रानोमाळ, लाल माती, स्वच्छ- सुंदर खड्डेरहित रस्ते केतकीच्या डोळ्यासमोरुन मागे सरकत होती. नेहाचा वेग नेहमीप्रमाणेच वाऱ्याबरोबर स्पर्धा करत होता. मागे बसलेलेल्या केतकीने शॉर्ट फ्लोरल स्कर्ट आणि टॉप घातला होता. नेहाने ए लाईन लॉंग ड्रेस घातल्याने तिच्या एका पायाची शिलाई अगदी मांडीच्या वरच्या भागा पर्यंत फिट केली होती. आतल्या काळ्या रंगाच्या पॅंटीचा काही भाग वाऱ्याने उघडा पडला होता. घोंगवणाऱ्या वाऱ्याचा हल्ला केतकीच्या स्कर्ट वर सुद्धा होत होता. तीची मात्र कशी बशी आपल्या मांड्याना लपवण्याची केविलवाणी धडपड चालू होती.

"नेहा...नेहा."..नेहाचा वाढता वेग पाहुन केतकी तिच्या कानाजवळ अक्षरशः किंचाळत होती.

ब्लॅक इन गोवा Where stories live. Discover now