आज मी एका व्यक्तीला विसरू शकत नाही. का माहित नाही कोण ती व्यक्ती हे बघुया थोड भूतकाळात जाऊन येऊया तर चला मग ................
५ वर्षा पूर्वी.....आज शाळेमध्ये शिक्षक थोडे उशिरा येणार होते. म्हणून सर्व विद्यार्थी गोंधळ करीत होते. माझा मित्र तुषार आणि मी असेच बोलत होतो. तेव्हा त्याने मला विचारले की..
तुषार: तु कधी प्रेम केलेस का.
मी: नाही रे, असे का विचारतोयस तू
तुषार: मी आज एका मुलीला शाळेत पाहिलं ती मला आवडलेली आहे.
मी: काय बोलतोयस.
तुषार: खरंच रे...
मी: बरं मग आता काय करणार आहेस.
तुषार: काही नाही बघुया मी तिला विचारतो आता.
मी: मला काय वाटतं नाही तुला हा म्हणेल ती.
तुषार: बघुया काय होतंय.(दुसऱ्या श्रणी शिक्षक येतात)
मी विचार करत होतो की मी पण प्रेम केले होते का बरं पूर्ण दिवस मी त्या विचारात होतोदुसऱ्या दिवशी
(तुषार हसत माझ्या जवळ येतो)
मी: काय रे काय झालंय तुला.
तुषार: मला ती हो म्हणाली.
मी आश्यार्य चकित होऊन बघत होतो तो हसतच होता त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू होत.
मी मग त्याला काय म्हणालो नाही व घरी निघालो तेवढ्यात मला एका व्यक्तीने आवाज दिला आवाज ओळखीचा वाटला मी मागे वळालो तर समोर वैभव होता .
(वैभव माझा लहान पणाचा मित्र होता)
वैभव: काय रे कुठ होतास तू इतक्या दिवस.
मी: नाही रे इथंच होतो की मी.
वैभव: बरं.....
मी:मग अजून काय चाललंय
वैभव: काही नाही रे तुझ काय चाललंय.
मी: काही खास नाही..... काल एका मित्राने मला विचारले की तुला कधी प्रेम झालं का.
वैभव: मग तू काय म्हणालास
मी: नाही म्हणालो
वैभव: किती खोटं बोलतोयस.
मी: मी काय खोटं बोललो.
वैभव: अरे शाळेत असताना तू एका मुलीच्या मागे लागला होतास ना विसरलास का एवढ्या लवकर....
मी: कोण रे
वैभव: समीक्षा......
मी: कोण....
वैभव: आता तूच आठव मी जातो मला काम आहे एक.
(वैभव तिथून गेला)
मी पण विचार करीत घरी निघालो. अचानक मला तिचा चेहरा आठवला मग सर्व काही सुरळीत पणे आठवायला लागलं.
ती आणि मी चांगले मित्र होतो. तिने आणि मी सोबतच शाळा सोडली होती. म्हणून मी तिला विसरून गेलो होतो पण आता सर्व काही आठवत होत.पुढच्या दिवशी
परत तूषारणे तोच विषय काढला मग मी पण म्हणालो मी पण प्रेम केल होत.
तुषार: काय खोटं बोलतोय तू.
मी: खरंच रे.
तुषार: गप बस.
मी: तुला दाखवतो.
मग मी लगेच सर्व जुन्या मित्रांकडून माहिती काढली. एक मित्र होता आकाश तो शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला होता. त्याच शाळेत ती शिकायला होती.
मी मग सर्व माहिती काढली आणि आकाश ला सांगितलं तिच्यावर लक्ष ठेव. मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही वेळ आल्यावर सगळ्यांना सांगणार होतो. पण वेळ एवढ्या लवकर येईल असे माहिती न्हवत.
मग मी ठरवलं की उद्या तिला भेटायला जायचं
मी आकाश ला घेऊन गेलो
त्याचा एक मित्र होता सौरभ तो आमच्यात येऊन बसला आकाश ला मी सांगितलं होत कोणाला ही सांगू नकोस पण तो म्हणाला विश्वासू आहे हा. मग मी पण काही नाही म्हणालो.
सौरभ खूप काही बोलत होता तिच्या बद्दल मला खूप राग येत होता मी रागावलो होतो तेवढ्यात आकाश ने ते बघितलं आणि त्याने त्याला गप बसायला सांगितलं
मला पण ती आल्याचं इशारा केला व मी तिकडे बघायला लागलो
सौरभ गप बसला होता.
मी तिच्याकडे बघत बसलो होतो तिला मी ४ वर्षा नंतर बघत होतो खूप सुंदर दिसत होती. तांबडे लाल केस थोडे घारे डोळे, रंग गोरा, नकटे नाक आणि, कोमल असे होट. मी तर तिच्या कडे बघतच बसलो होतो.तेवढ्यात मला काही विचार करायच्या आधी आकाश ने तिला आवाज दिला.
ती आमच्या कडे येऊ लागली तिने मला ओळखले ती म्हणाली तू संकेत ना....
मी मान डुलवत म्हणलो.
मी: हो लवकर ओळकलेस.
समीक्षा: तू कसे ओळकलेस मला.
मी: तुला कोण विसरेल.
समीक्षा: काय.
मी: खूप मोठी स्टोरी आहे नंतर सांगेल तुला.
आकाश: क्लास सुरू झालाय जातो आम्ही.
मी: ठीक आहे बाय.
समीक्षा: बाय परत भेटूया.
मी: का नाही लवकरच.
दुसऱ्या क्षणी ती तिथून निघून गेली मी मनातल्या मनात खूप खुश झालो होतो सर्व जग सुंदर वाटत होत मी आनंदा मध्ये होतो पण मला काय माहीत पुढे एवढे मोट संकट आणून ठेवलं आहे........
