............ हे ऐकता श्रनी मी खूप घाबरलो होतो कारण माझ्या बद्दल विचारणार तिथं कोण होत मी विजय ला विचारलं तो म्हणाला की खूप पोरं होतीत मला त्यांनी तिथं अडवल आणि तुझ्या बद्दल विचारू लागली तोवर माझ्या चाळीतील काही पोरं आल्यामुळे मला तिथून निघणं शक्य झालं
ते ऐकून मी मनातल्या मनात ठरवल की आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आणि विषय संपवणार संध्याकाळी सहा वाजता विजय ला घेऊन मी गेलो तिथे समीक्षा आली आणि मला बघून म्हणाली
समीक्षा: आज कसा इथे तू
मी: काम आहे एक
समीक्षा: पर्सनल
मी: नाही असं काय नाही वाट बघतोय एकाची
समीक्षा: कोण
मी: तुझ्या ओळकीचाच आहे कळेल नंतर तुला
समीक्षा: काय
मी: समजेल पण वाट बघ जरा
समीक्षा: बरं.... मी थांबू का जाऊ
मी: तू तर कधीच गेलीयास मग कशाला थांबतेस.
समीक्षा: काय.
मी: ओके बाय...
ती तिथून निघून गेली आणि मी विजय ला यायला खूनावल तो आला आम्ही वाट बघत बसलो होतो पण तो यायला काय तयार न्हवता. नंतर विजय ला म्हणालो कुठ राहतो तो.
विजय नी मला त्याच्या घरी घेऊन जाण्यात राझी झाला मी आणि तो अशी आमची सेना तिथं गेलो पुढे पोरं बसली होत्यात ते आमच्या जवळ आल्यात आणि आम्हाला विचारल की कशाला इथे आलाय एकड मी म्हणालो विषय संपवायला तो म्हणाला कसला विषय आहे
समिक्षाचा विषय आहे ते ऐकून तो गप बसला आणि पोरांना पुढे येण्यास खुनावल मी पण थोडा घाबरलो आणि विजय पण. विजय नी सायकल आणली होती आणि ती माझ्या जवळ होती मी विजय ला म्हणालो की तू जा मी बघतो.
तो जात न्हवता पण मी त्याला म्हणालो. तो जायला लागला मी गप होतो ती सगळी पुढे पुढे सरकत होती मी सायकल वर होतो सायकल तर चालवायला येत न्हवती पडण्याच्या भीतीने कधी चालवली पण नाही पण आज जर चालवली नाही तर कदाचित हात पाय मोडल असतं. मी लगेच सायकल वळवली आणि पुढे जाऊ लागलो आणि घेअर टाकला आणि सुसाट गेलो पाटी मागे होतात ती पण निघालो पुढे विजय दिसला आणि त्याच्याकडे सायकल दिली आणि म्हणालो पळव आणि सुसाट गेलो....घरी आल्यावर मी सर्व काही झालं त्याचा विचार करीत होतो विजय आला आणि म्हणाला आपण का गेलो होतो. मी म्हणालो बोलायला. मग त्यांना का म्हणालास विषय संपवायला. मग अजून काय बोलायचं होत .तेच माझ्या एका शब्दामुळे आज मी मार खाल्ला असता हाच प्रसंग आसा होता की कोशिश करून सुद्धा सायकल शिकलो नाही ते आज शिकलो अजून आठवत हे.
शाळेत आलो आणि खूप चांगलं चाललं होत पण परत काही तरी नवीन आल दोन तीन दिवसांनी रमा माझ्या जवळ आली आणि म्हणाली की समीक्षा नी मला भेटायला बोलावले आहे. मी आश्चर्य चकित झालो खूप खुश पण होतो आणि घाबरलो सुद्धा होतो कारण मला डाऊट होता की रमा नी सगळ सांगितलं आहे मी तिला विसरून थकलो. की तु काय सांगितलं तर नाही ना
ती काही बोलायला तयार न्हवती. मग मी जायचं ठरवल आणि गेलो त्या वेळी मोहित गौर च एक गाणं खूप हिट झाल होत त्या मुळे त्याचा लूक मला आवडला होता. पँट दुमडून वर घ्यायची केस थोडे माथ्यावर घ्यायचे आणि त्यावर टोपी घालायची मला खूप आवडले होते मी तसाच लूक करून तीला भेटायला गेलो ती समोरून येऊ लागली होती मी तिच्या कडे बघून स्माईल दिली ती लांब होती म्हणून मला बरोबर दिसल नाही जवळ आल्यावर तिचा चेहरा बघितलं आणि ती रागामध्ये होती मी तिला पाहून ओळखले की त्या पोरांनी तरी सांगितले असेल नाही तर रमांने तरी. मी तिला विचारल काय झालंय
समीक्षा: काय चाललंय तुझ
मी: काही नाही चांगलं चाललंय
समीक्षा: सगळ्यांना काय सांगितलंस
मी: काय नाही
समीक्षा: क्लास मधे सगळी तुझ्या नावानी मला चिडवत आहेत
मी: कोण चिडवत होत
समीक्षा: आकाश आणि त्याचे मित्र
मी: सांगतो मग मी त्याला
समीक्षा: काय सांगणार तूच सांगितलंस ना त्याला चिडवायला तूच सांगितलं असणार ना खूप मोठा जवळचा मित्र आहेना आणि मीच भेटलो का तुला गर्लफ्रेंड बनवायला तू का असा करतोय. हा आणि रमाला पण तूच सांगितलंस ना तिने पण सगळीकडे केलं आहे सगळी डाऊट गेत्याताय माझ्या वर तू पहिला होता तसा आता नाहीस किती विश्वास होता तुझा माझ्यावर पण नाही तुला तर गर्लफ्रेंड पाहिजे ना तू जे काय करतोयस ना ते सगळ चुकीचं आहे तुला त्याच्या बद्धल खूप काही भोगायला लागेल. मी म्हणालो भोगतच आहे.समीक्षा म्हणाली आणि तू जे मला दुखी केलाय ना ते मी कधी विसरू शकत नाही तुला मी काय समजत होते आणि तू कसा निघालास तू उद्याच यायचं आणि सगळ काही सगळ्यांना सांगायचं आणि माझ्या मित्राला सुद्धा भेटून हे सगळं सांगायचं समजलं ना तुला. बघत काय बसलाय बोल काही तरी...
. ( थोड्या घोग्र्या आवाजात मी म्हणालो)
मी: नक्की
ते ऐकून ती तिथून निघून गेली मला बोलण्याची संधी भेटली नाही काय बोलायचं हे पण समजत न्हवत रडू पण येत होत पण रस्त्यावर सर्व लोक माझ्या कडे बघत होते मी तिथून गेलो खूप रडू वाटत होते पण रडण्याची वेळ न्हवती घरी आलो तर घरी गावी जाण्याची तयारी सुरू झाली होती माझे समान पण पॅक झालं होत आजच गावी जायचं होतं हे ऐकल्यावर मी काय करायचं हे मलाच समजलं नाही लगेच आकाश कडे गेलो आणि त्याला म्हणालो परत जर का माझ्या कानावर आल की तुम्ही तिला माझ्या नावाने चिडवतात तर माझ्या पेक्षा कोण वाईट नाही आणि तिथून लगेच रमा कडे गेलो आणि तिला म्हणालो तू जे केलस ना ते खूप वाईट केलास पण मी तुला काहीच बोलणार नाही.
तिथून मी तुषार ला गाटल त्याला म्हणालो परत जर का माझ्या सोबत बोललास ना तर बघ...
त्याला काही समजले नाही.
