भाग :- ०१

1.4K 8 1
                                    

नमस्कार माझे नाव अमित सोनवणे . मी महामंडळात कंडक्टर म्हणून गेली आठ वर्षे काम करत आहे .वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी मी येथे रुजू झालो . पहिला दिवस ते आज पर्यंत मला चांगले आणि वाईट असे दोन्ही ही अनुभव मोठ्या प्रमाणत आले आहेत . त्यापैकी मी काही आज तुम्हाला सांगणार आहे . सर्वात अगोदर चांगले प्रसंग सांगतो . नाही म्हणजे माझी धर्मपत्नी सुध्दा मला या महामंडळात मिळाली ना म्हणून तर सुरावात तिच्या पासून करूयात .

आज तीन महिन्याचे ट्रेनिंग करून , मी बस मध्ये लोकांचे तिकीट काढणार होतो . मला अकोला ते  मूर्तिजापूर ही गाडी मिळाली होती . ड्रायव्हर म्हणून सतीश काका होते , त्यांच्या बद्दल खूप काही मी अगोदर पासून ऐकून घेतले होते . जसे की त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणे कोणाला जमत नसे , तसेच ते स्वभावाने मात्र खूप शांत आहेत . हो मी पण अकोला येथील आहे आणि काका सुध्दा बाभुळगाव येथील होते , ते आमच्या अकोल्यवरून दहा किलोमीटर लांब आहे .

आबे पोरा कायचा विचार करू रायला बे , सतिश काका माझ्या बाजूला उभे राहून मला विचारत होते . कायचे काही ओ काका , मले तर लय भेव लागत आहे बा . मी त्यांना म्हणालो , त्यावर काका मला म्हणाले . हे पाय पोरा , तू काही काईजी नको करू . काका यांच्या त्या शब्दाने माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली . आम्ही दोघेही बस घेऊन निघालो , अहो निघालो म्हणजे शेड मधून बस बाहेर घेऊन आलो .

सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी काही फार नव्हती . काही वेळात बस रस्त्यावर चालू लागली . चला तिकीट तिकीट , एक तर माझा आवाज थोडा मोठा आहे . त्यात भर म्हणून मी थोडे जोरात ओरडत होतो . आहो पावणे बुआ , थोडे आरामात घ्या की .
एक साठ वर्षांचे आजोबा मला जोरात म्हणाले . मला पण कळून चुकले की आपण थोड्या जास्त आवाजात विचारत होतो . बस मध्ये एकूण दहा - बारा लोक होते . त्यात माझी नजर त्या दोन मुलींवर गेली . नाही म्हणजे आता पर्यंत तरी मी मुली पासून दोन हात दूर असायचो . अहो का बरं असे तर एक वेळ मी सुध्दा सलमान खान याचे तेरे नाम या चित्रपटातील गाणी खूप ऐकत होतो . आता तुम्ही काय अर्थ लावायचा आहे तो लावत बसा .

कंडक्टर ...Donde viven las historias. Descúbrelo ahora