भाग :- ०२

804 0 0
                                    

तर मग या भागात पाहुयात माझी बायको मिळवण्यासाठी चे धडपड . (( स्वतःच्या पायावर मारण्यासाठी दगड शोधणे .))

त्या दिवशी मी तिला बघितले आणि काय ती मुलगी तब्बल सात दिवस आलीच नाही . आठव्या दिवशी किटली (( ज्यांना किटली कोण आहे , माहीत करायचे आहे त्यांनी कथेचा पहिला भाग वाचावा .)) बस मध्ये आली . मी तिच्या जवळ गेलो आणि तिकीट काढून दिले . आता ती बाई तर अगोदर पासून मला चुकीचे समजत होती . तिला मी विचारले की माझी बायको का नाही आली आठ दिवस झाले आज तर आपली काही खैर नाही . हे मनातून जाणून होतो , त्यामुळे न विचारणे बरे आहे अमित .

मात्र या आठ दिवसात लोकांना काय बोलावे हे मला जमले होते , नाहीतरी आम्ही अकोला वाले लवकरच सारे काही शिकत असतो . (( मुळात हा सारे अकोला वासी यांचा गैरसमज आहे .)) त्यामुळे आता कसे बोलावे , कुठे आपले तोंड उघडले पाहिजे . हे सारे शिकत होतो . आता त्या दिवशी माझी काही चुकी नसताना त्या आजी बाई मला सूनाऊन गेल्या होत्या . त्याचे झाले असे की ,

आपल्या दररोजच्या वेळी आम्ही म्हणजे सतीश काका आणि मी बस घेऊन निघालो . चला तिकीट तिकीट , असे मी हळु आवाजात बर का म्हणत होतो . अरे बाबा एक बोरगाव ( मंजू ) दे बरं . आजी बाई मला म्हणाल्या आणि मी लगेच त्यांना तिकीट दिले . हे पाय पोरा ते गावं आल की मला आवाज देजो बरं , नाहीतर करशील माई पंचाईत . आजी बाई एकदम ठणक आवाजात मला  म्हणाल्या . हो ठीक आहे आजी , असे म्हणून मी पुढे तिकीट काढण्यासाठी गेलो . आता गाडी बोरगाव ( मंजू ) जवळ आली , मला आठवण होते की आजी बाई येथे उतरणार आहेत . मात्र एक काका त्यांचे काही सुट्टे पैसे बाकी होते आणि ते खूप घाई गडबड करत होते , त्यामुळे त्यांच्या चक्कर मध्ये कधी बोरगाव ( मंजू ) गेले . अगदी हे मला सुध्दा आठवण नाही राहिले .

आता गाडी पळासो ( बढे ) मध्ये पोहचली , मी लगेच आपल्या भारी आवाजात म्हणालो . चला  पळासो ( बढे ) आले आहे , उतरा लवकर . मी माझे बोलणे पूर्ण नाही करत तर आजी बाई मागून जोरात ओरडू लागल्या . सुरवातीस तर बस मध्ये सर्वांना वाटले की आजी बाई यांना काहीतरी त्रास होत आहे . त्यामुळे मी लगेच आजी बाई यांच्या जवळ पोहचलो , काय झाले आजी . अरे मेल्या मुर्द्या , तुले माहीत नव्हते का मले बोरगाव ( मंजू ) येते उतरायचे होते . कुठे ध्यान होते तूये . मला मात्र आपण कोणत्या संकटात पडले आहोत असे वाटले . दोन मिनिट माया डोळा काय लागला , याने तर बाई मले या  पळासो ( बढे ) इथे आणून सोडले .   आजी बाई आपली कथा सर्वांना सांगत होत्या , येते मला एका सांगावे वाटते , असे म्हाताऱ्या माणसांनी एकटे प्रवास करू नये . (( माझे स्वतचे मत आहे .)) आता माया जवळ बाप्पा वापस जायचे पैसे नहीं आहेत , ओयं पोरा दे मले पैशे . मी गुपचूप त्यांना पैसे देऊन दिले . खाली उतरल्या नंतर सुध्दा आजी बाई आपली कथा सर्वांना सांगत होत्या . म्हटले जाऊ द्या म्हातारे लोक असे करत असतात .

कंडक्टर ...Where stories live. Discover now