भाग :- ०३

468 2 0
                                    

तर मग या भागात पाहुयात सतिश काका यांनी सांगितलेले ज्ञान माझ्या काही कामात आले का नाही ,

आज बरोबर बारा दिवस झाले होते आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोचे दर्शन घेतले नव्हते . (( आता काय स्थिती असेल याचा अंदाज लावावा , लग्नाला आठ वर्षे झाली म्हणून . ))
घरून निघताना देवाच्या पाया पडून आलो होतो , अहो कश्यासाठी काय ती दिसली पाहिजे म्हणून ना .

काका आज तुम्ही पहा मी तुम्ही सांगितले मुद्दे कसे बोलतो . मी अतिउत्साह मध्ये काकांना म्हणालो , हे पाय पोरा अती घाई देवाघरी नेई . असे म्हणून.काकांनी माझा आत्मविश्वास कमी केला . मनात म्हटले जे होईल ते बघून घेईल . बस घेऊन आम्ही बसस्टॉप मध्ये आलो , काही वेळात बस भरू लागली . आज थोडे शिशित मंडळी जास्त होती . त्यामुळे त्यांना थोडे कमी बोलावे लागते . कारण त्यात तर कधी त्यांचा सटकला आणि आले मारायला . नाहीतर आजकाल लोक पोलीस यांना मारायला तर भित नाही , मग माझ्या सारख्या माणसाला मारणे कोणती मोठी बाब आहे .

थोड्याच वेळात बस निघणार होती , तरीसुद्धा ती अजून काही आली नव्हती . शेवटी बस मधील लोक म्हणायला लागले की कधी बस सुरू करतात . मी काका जवळ गेलो आणि डोळ्यांनी त्यांना ती नाही आली म्हणून सांगितले . काकांनी मला धीर दिला .
शेवटी मी बस सुरू करायला सांगणार तेवढ्यात ती आली . आज मॅडम ने पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातला होता , तिच्या वर छान असे कलाकृती होती . ती मला दिसताच मी थोडा हसलो तिच्याकडे बघून , तिने सुध्दा मला परत एक गोड स्मित हास्य दिले . मग भाऊ मी गाडी काढली ना , एकदम जोरात .

सर्वांचे तिकीट काढून झाल्यानंतर मी तिच्याकडे गेलो . मी जाताच तिने मला आपली पास दाखवली . मी तिकीट काढून दिले आणि परत जाऊ लागलो . अचानक सतिश काका यांनी दिलेले वाक्य लक्ष्यात आले . हे पाय पोरा , पोरी सोबत बोलताना आपल्या बद्दल विचारायचे नाही . तिची मैत्रीण राहते ना तिच्या बद्दल विचारायचे .  आज तुमची मैत्रीण नाही आली सोबत , मी अचानक  तिला विचारले . अहो ती माझी मैत्रीण वैगरे काही नाही , ती तर तुम्ही मला बघत असता आणि तिच्या कडे नाही . त्यामुळे ती खूप रागाने बोलत असते तुमच्या बरोबर . (( येथे एक लक्ष्यात घ्यावे , हे आव - जावं बोलणे पाहिले आणि अखेर होते . त्या नंतर काही मला इतकी इज्जत नाही मिळाली .))  बोलण्या आधी मुली काही विचार करतात या बद्दल कधी कधी शंका येते , नाही म्हणजे अहो ती मला एकाच वेळी सारे काही सांगून गेली आणि मी मात्र अस्वला सारखा एका जागेवर उभा होतो .

कंडक्टर ...Donde viven las historias. Descúbrelo ahora