ही एक कथा नसून माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे.
घटना वर्ष २००४- २००५ ..कोकणातील एक गाव वेळ संध्याकाळी ७ वाजता गावातील नाना (वय ६३ तालुक्यातील एक मोठे मांत्रिक) यांच्या घरा समोर गर्दी जमलेली सर्व गावातील लहान मुले बायका शेतावरच काम संपून दमून आलेली वयस्कर माणसे फक्त आज नाना काय करणार हे पाहणार होते कारण आज गावात काही आस होणार होत कोणी विचार ही केला नव्हता. कारण नानाच पच्कोशित खूप नाव होत खूप लांबून लोक नानाकड भूत उतरवायला येत होती पण आज नाना समोर बसलेली मुलगी होती गावातील वैशाली ( वय १९ गावातील खूप हुशार मुलीनं पेकी आणि मेहनत करणारी मुलगी).
नाना वैशाली कडे बघून हातातील काठी तिझ्या आंगवर उचलली आणि एकदम मोठ्या आवाजात ओरडले कोण आहेस तू..का आलास हीच्यापाठी ....
"वैशाली फक्त नानाकडे बघून हसत होती" आणि ती जेव्हा हसली गावातील लोकांच्या आंगावर जणू काटा
आला...कारण सगळ्यांना समजल की हिच्या आंगत कोण तरी आलंय ...
नाना ने काठी उचली आणि तिज्या पायावर वाजवली आणि...त्याच आवाजात
"सांगतोस का ...देऊ आजुन ...
जसे जसे नाना ओरडत होते तसा तसा तुझा हसण्याचा आवाज वाढत होत ..त्यांच्या ओरडण्याचा काहीही परिणाम दिसत नव्हता .....
नाना पण खूप राग आला त्याने त्यांच्या समोरून काही तांदूळ उचले आणि मंत्रून तीझ्या तोंडावर फेकले ...
बस् ..
वैशालीच्या तोंडून हसत हसत एक नाव आल ....
मी नरेश ... आणि गावातील सगळी लोक मागे सरली..
नाना पण धक्का बसला ...
नाना परत बरसले
'खर सांग कोण आहेस'... नाहीतर तू आज वाचत नाहीस माझ्या हातून ...
एवढं वेळ हसत असलेली वैशाली एकदम रागात आणि एका तंडक्या मुलाच्या आवाजात बोली
"नाना मी काय हिला सोडत नाय बघ आता"
गावातील गर्दीत लगेच चर्चा नरेश हाय ....
कोणालाच खर वाटत नव्हत ...
नाना बोले ..
कुठ पकडलीस हिला ?
वैशालीच्या तोंडून नरेश : तिथंच जिथून मी गेलो.....
वेळेवर भेटली.. कसा सोडू..क्रमशः
लेखक : चिवल्या(ही घटना पूर्णतः सत्य आहे जर तुम्हाला माझा लेख आवडला आसेल तर मी पुढील भाग प्रदर्शित करेल )
