जेमतेम मी पंधरा वर्षे आधी च्या जगात पोहचले होते, एक अशी मुलगी माझ्या समोर होती ,केस कुरुळे त्यातही छोटे केस हिप्पी असलेली ती मुलगी होती , अंगात मुलाचा प्यांन्ट, असून वरती टी शर्ट, सावळा रंग खिशात मोबाईल आणि बेधुंद, बेजबाबदार, कुणाचाही धाक नसणारी अशी ती मुलगी, दिवसभर कुणाच्याही घरी विसावा घेणारी, जणू ती आपल्याच्या शोधात निघाली होती, हे बघून सगळे मात्र तिच्या बद्दल जरा वेगळाच विचार करायचे"सगळे तिला लोफर म्हणायचे, आणि त्यात तिची काय चूक ती दिसतही तशीच होती,, पण ती अशी का होती कुणी विचार देखील केला नसेल,,, तुम्ही केलाय का कधी विचार की कोणतीही परिस्थिती निर्माण व्हायला दोन बाजू लागतात काही चूक स्वतःची आणि काही चूक दुसऱ्याची,,