काही गोष्टी तिला स्वतःह विचारल्या असता समजल की ती एका छोट्या गावातून शहरात आली होती, येवढेच नसून भल्या मोठ्या कुटुंबातील असून त्या आठ बहिणी आणि एक भाऊ याच्या मधील एक होती आणि बहीण भावात सर्वात लहान, मग प्रश्न पडला असा की ती शहरात का आली असेल,, त्याचं उत्तर असं,, तिच्या वडिलांना तीन बहिणी त्यातली सर्वात लहान बहीण ही शहरात रहात होती, तिला मूल नसल्याने तिने, हिच्या आई कडून मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, आणि लहान बहीण म्हणून आणि त्यांचेही कुटुंब मोठे होते. त्यात गरिबी म्हणून मुलीच्या आई वडिलांनी चटकन हो म्हणले,, आणि म्हणून हिला ईच्या आत्याच्या घरी पाठवले,, पण ज्या वेळी ही आत्याकडे आली हिचे वय हे तीन वर्षे असावे,,हे तिला देखील आठवत नव्हते की वय नक्की किती होते, पण असो, पुढे ती सांगू लागली, यानंतर जेव्हाही तिच्या गावी जायची तिला तिला तेथून शहरात येऊ वाटत नसे इतके मोठे कुटुंब इतके एकत्र राहणारे लोक तिला हवेहवेसे वाटत, ती लहान होती म्हणून तिला बालपण जगण्याची इच्छा होत असे,, नंतर तिने जे सांगितले ते सांगताना तिला रडू येऊ लागले,,