हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी 'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना केली आहे. "कैलास "ने गोमाता पूजेची आणि गोसेवेची परंपरा वेद-आगमानुसार पुनरुज्जीवित केली आहे.
हिंदू धर्मानुसार, गायीच्या ठिकाणी सर्व देवदेवतांचा वास असतो, म्हणून गायीच्या सान्निध्यात राहून, तिची सेवा करून आपण सर्व देवीदेवतांच्या सेवेचे पुण्य कमावतो.
जेव्हा गायीचा आदर केला जातो, तिची पूजा केली जाते, त्या वेळी परमानंदाच्या भावना तिच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे तिच्या दुधात परमानंदाच्या जैविक स्मृती उतरतात, समजले का?
गाय ही मानवाप्रमाणेच संवेदनशील आहे आणि त्या संवेदना ती रक्तात पाठवू शकते आणि संपूर्ण शरीरात. काळजीपूर्वक ऐकून घ्या , तुमच्या भावना जशा तुमच्या रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम करतात, तसंच गाईच्या भावना देखील गाईच्या रक्तावर पर्यायाने तिच्या दुधावर परिणाम करतात. प्रसन्न गाईच्या दुधाचे घृत तुमच्या संपूर्ण मेंदूला कार्यान्वित करते.
-- हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् भगवान श्री नित्यानंद परमशिवम् .
कामिक आगमामध्ये विविध प्रकारच्या स्नानांचे वर्णन आहे. त्यामध्ये सर्वोत्तम स्नान म्हणजे गोरज स्नान ज्यामध्ये गायीच्या चरणधुळीचा समावेश असतो.
शास्त्र प्रमाण- ५
गोशाला दक्षिणे देशे पुष्पवाटी तथोत्तरे | अथवा सर्वकाष्ठासु वापीकूपतटाककाः
अनुवाद : गावाच्या दक्षिणेकडील जागेत गोशाळा बांधलेली असावी. फुलांचे उद्यान उत्तरेस तर तळी, विहिरी व हौद हे गावाच्या सर्व दिशांना असावेत.
(कामिक आगम, अध्याय- ३०,श्लोक १४ वा )
एकसल द्विसल व त्रिस्अल वथ कल्पयेत्.
अनुवाद - गोशाळेसाठी एक मुख्य इमारत किंवा दोन-तीन इमारती मिळून एक रचना केलेली असावी. अथवा चार मुख्य इमारतींचीही त्यांच्या लांबीच्या योग्य प्रमाणात रचना करता येईल.
YOU ARE READING
'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना
Spiritualहिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी 'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना केली आहे. "कैलास "ने गोमाता पूजेची आणि गोसेवेची परंपरा वेद-आगमानुसार पुनरुज्जीवित केली आहे. हिंदू धर्मानुसार, गायीच्या ठिकाणी सर्व देवदेवतांचा वास असतो, म्हणून गायीच्या सान्निध्यात...