गार्डन मध्ये तो एका बाकावर बसला होता, डोक्यावर बरोबर मध्ये टक्कल पडलेलं , तोंडात दात जवळपास न्हवतेच , हातात एक काठी. आणी समोर खेळणाऱ्या लहान मुलांवर त्याच लक्ष, त्यातील एक मुलगा त्याच्या जवळ आला आणी
मुलगा : चला ना आजोबा, मला आईस्क्रीम घेऊन द्या.
त्याने एक हलक स्मित दिल त्या मुलाला, काठी जमीनीवर ठेवत तो उठला आणी मुलाचा हात धरून चालू लागला.
हे सगळं घडत असताना एक व्यक्ती त्याच्या कडे टक लावून बघत होती.
नाव विजय, वय वर्ष पन्नास, घरात बायको मानसी, मुलगा विशाल, सून रिया,मुलगी नेहा जिचं लग्न होऊन विदेशात सेटल झालेली आणी या सगळयांची जान म्हणजे छोटस पिल्लू मिहीर असं एक छोटस कुटुंब, हे कुटुंब म्हणजे आजच्या युगात पण एकत्र असंणार . गार्डन मधून जेंव्हा दोघ घरी आले तेंव्हा विशाल कामावरून घरी आला होता, मानसी आणी रिया किचन मध्ये काम करत होत्या.
मानसी : कारे मीहू आज उशीर का झाला यायला.
मिहीर काही बोलेना मग रिया बाहेर आली बाबांना चहा दिला मिहीरच्या हातात आईस्क्रीमच पॅकेट तसच होत रियाने ते हातात घेतलं
रिया : हे बघा आई, याच्यामुळे वेळ झाला.
मानसी : काय रे मिहीर हे कुणी दिल तुला. ( जरा रागातच )
मिहीर फक्त आजोबांना बघत राहिला.
मानसी : काय हो तुम्हाला कितीदा सांगायचं असल्या
वातावरणात थंड खाल्याने सर्दी होऊ शकते.मानसीच वाक्य संपायला आणी विजय चहा पिता पिता शिंकला
मानसी त्याच्याकडे रागाने बघू लागली इतक्यात मिहीर बोलला
मिहीर : आजी आजी, मी फक्त एक आईस्क्रीम खाल्लं आणी
आजोबानी दोन खाल्लीरिया सगळं बघून आपल हसू आवरत
रिया : राहू द्या हो आई, काही नाही होत एकदा खाल्लं तर.
विजय काही बोलू शकला नाही ते म्हणतात ना म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण मग काय घरात विजय आणी मिहीर दोघे लहान झाले होते . रिया आणी मानसीला मिहीर पेक्षा विजयची जास्त काळजी असायची.