प्रेमपत्र
मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे.
आता मी तुम्हाला *#$$### लागणे म्हणजे काय ते सांगणार आहे.
साल 2014 मी दहावीत असतानाची गोष्ट.
मी, विवेक (गोटया),संदीप (काळ्या ), आणी वैभव (वैभ्या) ही आमची गँग. आम्ही सगळ्यांनी दहावीच्या वर्गात एन्ट्री घेतली. सगळे आमच्या ग्रुपला अलिप्त ग्रुप म्हणायचे कारण आम्ही फक्त कामापुरते दुसऱ्यांशी बोलायचो.तर गोष्टीला सुरुवात होते वैभव पासुन, म्हणजे तसा बघायला गेलं तर दिसायला बराच, अंगाने साधारण. तर त्याला आमच्या वर्गातली एक मुलगी आवडायची काजल. काजल म्हणजे दिसायला एकदम सुंदर, शाळेतली माधुरीच म्हणाना. तर वैभवला काजल आवडते ही गोष्ट त्याने आम्हाला सांगितली मग काय, आम्ही पण त्याचे जिगरी दोस्त त्याची सेटिंग लावायला तयार झालो. दुसऱ्या दिवशी वैभ्याच्या नावाने एक पत्र, ..... प्रेमपत्र लिहलं काजल साठी.
आणी दिल तिला तर त्या येडीने, हो येडीच तुला नाही म्हणायचं होत तर तस सांगायचं ना सरांना मध्ये घ्यायची काय गरज , तर तिने ते पत्र वाचलं आणी डायरेक्ट शहापूरकर सरांना नेऊन दिल, शहापूरकर सर म्हणजे शाळेतले सर्वात मोठे व्हिलन, मारायला लागले तर पोराने चड्डी ओली केली पाहिजे. तर ते पत्र तिने नेऊन शहापूरकर सरांना दिल, त्यादिवशी
#$#$&%@$% लागणे म्हणजे काय ते समजलं .शहापूरकर सरांनी आम्हला लई धुतला, लई म्हणजे लई धुतला. तेंव्हा पासून आम्ही ठरवलं पोरींच्या नादी नाही लागायचं. कारण लागलं तर त्या आम्हांला #$#%&#लावतात.
पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो होतो, काजल शहापूरकर सरांची मुलगी होती 😁😁😁😁😁😁