नकळत सारे घडले....🥵💋✨ भाग 1

3K 4 1
                                    

" राशी अजून किती त्रास देणार....अजुन किती दिवस लांब राहणार आपण... " असं बोलून एक मुलगा तिचा फोटो बघत बसला होता त्या फोटोत गोड हसणारी गोबऱ्या गालांची सुंदर अशी मुलगी दिसत होती यांची लहानपणापासून ची बालमैत्रीण राशी जोशी होती दोघे लहानाचे मोठे सोबत झाले पण यांनी मैत्रीच्या पुढे जाऊन तिच्यावर प्रेम करू लागला तर ती अजुन दोघांच्या नात्याला फक्त चांगलं मैत्रिणी म्हणून बघत होती आता पण तो कट्ट्यावर तिची वाट बघत बसला होता आणि सोबत मोबाईल मध्ये असणारे तिचे चोरुन काढलेले फोटो बघत एकटाच बडबड करत होता त्याला माहित होतं की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण तिच्यासमोर व्यक्त करायची त्याच्या तेवढी हिंमत नव्हती झाली कारण त्याला प्रेमाच्या मुळे मैत्री गमवायची नव्हती...💜

" अरे  नित्या एकटाच कोणाशी बडबड करतोयस असं बोलून राशी त्याच्या बाजूला येऊन बसते... तसं नितीन लगेच आपला मोबाईल लॉक करून बाजूला ठेवतो

" काय नाही मॅडम तुमचीच वाट बघतोय आम्ही तुम्ही नेहमीसारखे उशिरा आलेल्या आहात..." तो गालात् हसत बोलतो.

"अरे काय करणार निघाले आणि एक इम्पॉर्टंट काम आठवण  ते करून आले सॉरी नित्या...." राखी एकदम क्युट फेस करून दोन्ही हात कानावर पकडून त्याला सॉरी बोलते आणि तो तर लगेच राग विसरून पण जातो तिला वन साईड हक करून जवळ घेतो

" अरे आपण ज्या त्याच्यासाठी भेटलो ते तर राहूनच गेलं...  बरं सगळी तयारी झालेली आहे ना काही घ्यायचं असेल तर आज जाऊन घेऊन ये उद्या ट्रेकिंगसाठी लवकर निघायचं आहे मी खूप एक्साईट आहे फर्स्ट टाईम फक्त आपण दोघं जात आहोत.." .ती खुप खुश होत बोलते...त्याला फक्त आपण दोघे  ऐकून अंगावर शहारा येतो.

" हो गरजेचे सगळ्या वस्तु घेतल्या आहेत तरीही अजून एकदा मार्केटला जाऊन चेक  करून राहिलेलं घेऊन येतो पण उद्या वेळेवर ये म्हणजे झालं..."

" उद्या मी तुझ्या पहिलच ठरलेल्या ठिकाणी येईल बघ चॅलेंज आहे माझं..." ती नाक मुरडुन बोलते.

नकळत सारे घडले ❤️Where stories live. Discover now