#नाती_जपतांना - कथा १

58 2 0
                                    

#नाती_जपतांना - कथा १

वल्लरी व सचिनच्या लग्नाला आज ५ वर्षे पूर्ण झाली. संध्याकाळी घरी जेवायला नाही हे सकाळी सांगुनच ते घरा बाहेर पडले. सुधा ताईंच्या डोळ्यासमोर मागिल वर्ष भरभर पिक्चर फिल्म सारखी तरळली.

मी च का बदलू पासून ते त्याला/ तिला आवडत आहे तर काय हरकत आहे पर्यंतच्या प्रवासात त्याही एक साक्षीदार होत्या. त्याच्या नो सेलिब्रेशन थिम ते एक गुलाब व मनापासून दिलेली दाद हा बदल त्या दोघांच्या आयुष्यात सुख पेरत होता. खरेच वल्लरी च्या अपेक्षा किती माफक होत्या.

ओपनली कौतुक व सिक्रेटली फिडबॅक हा आईने दिलेला सल्ला सचिनच्या खूप उपयोगी आला होता. सुख समाधान म्हणजे काय असतं , हे स्वतःमध्ये काही बदल केल्याशिवाय थोडीच कळते. आपल्या माणसाला आपलेपणानेच जिंकता येते.

नाती जपताना, प्रत्येकाने दोन पावलं मागे पुढे केल्यानेच आनंद निर्माण होतो हे त्या दोघांनाही समजलं होतं. मनोमन भरपूर शुभाशीर्वाद देऊन सुधाताई परत कामाला लागल्या.... समाप्त!!

- सौरभ पटवर्धन ©®

नाती_जपतांनाTahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon