आणि मी निघालो...
येथून पुढे....तेव्हा पासून मी निधी ला कॉल, मेसेजस खूप वेळा केले, पण मला एकदा ही, त्यावरती काही रिस्पॉन्स आला नाही,
२ महिने झाले मॅडम च आणि माझं काही संवादच नव्हतं.
शेवटी मी ठरवले मॅडम ला भेटायचं. मी सुट्टी काढून मॅडम च्या घरी गेलो..मी तेव्हा नवीन बाईक घेतलेली ती घेऊन २ तासाच्या प्रवासनंतर मी मॅडमच्या घरी गेलो.
तिथे गेल्यावर समजलं की मॅडम तिथे आता राहतच नाहीत, आणि कळलं की मॅडम त्यांच्या गावाला गेल्या आहेत. मी मॅडम चं पत्ता शोधायला कॉलेज मधे गेलो, मला पत्ता कॉलेज मधून मिळालं आणि मी तिकडे रवाना झालो.
मी गावात पोहचलो आणि निधी च घर म्हणून विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, सरळ जाऊन उजवीकडे. मी गेलो तर पाहतोय काय!!लग्नाचं मंडप, सर्व लोकांची गर्दी.. मला समजून यायच्या आधी लग्नाचं बॅनर दिसलं निधी आणि वरुण. माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मी निधीला शोधत शोधत, मेकअप रूम आलो, तर ती नटून तशीच बसलेली.
मी आत रूम मधे डोकवत पाहिलं कुणी आहे का आजून आत, कुणी नाही ह्याची खात्री करत मी आत शिरलो आणि दरवाजा लावला.
कडीचा आवाज येताच तिने पाहिले, ती रडत होती, मी पाहिल्यावर, निधी आनंदाने अश्रू पुसत माझ्याकडे धावत येत जोरात मिठी मारली, आणि रडू लागली, मी ही रडत मिठी मारत म्हणालो...निधी काय आहे हे सर्व...,
तू माझं एक फोन ही उचंलस नाही..मॅडम मला घट्ट मिठी मारत, रडत म्हणाल्या,
आय एम सॉरी विनय, मला हे लग्न नाही करायचंय, तेवढ्यात मी मिठी सोडवत म्हणालो
मॅडम तुम्हाला मी आवडतो ना?
मॅडम - (रडत मान खाली घालून) हा खूप.. पण.....मी - पण काय मॅडम?
मॅडम - आपलं वय... (असं म्हणत रडू लागल्या)
मी मॅडम चं हात हातात घेऊन म्हटलं..
मी - मॅडम प्रेमाला वय नसतं.. तुम्ही आता हो म्हणा आपण आजच लग्न करू.
मॅडम ने हे ऐकून मला घट्ट रडत मिठी मारली...मॅडम - मला खूप आवडतोस तू.. विनय प्लीज घेऊन चल मला इथून, प्लिज घेऊन चल.. दूर कुठेतरी....
मी - मी (मॅडम ला मिठीतुन सोडवत)काळजी करू नका मॅडम, मी आहे ना. तुम्ही पहिलं साडी बदला, मी बाहेर जाऊन माहोल बघतो.
मॅडम ने साडी बदलून ड्रेस घातला, मी बाहेर पाहिलं, कुणी हि नव्हतं. मुहूर्ताला वेळ होता, मांडवात ठराविकच लोकं होती, आणि बाकीची सर्व मागे होते, जेवणाच्या तयारीत.मी वरती मेकअप रूम मधे आलो, मॅडम ने ड्रेस घातला होता. मॅडम ना सांगितलं की ओढणी डोक्यावर घ्या, मी बाईक जवळ आणतो, गेट जवळ आणतो.
असं म्हणत मी खाली जाऊन बाईक गेट जवळ आणली, मॅडम ओढणी डोक्यावर घेत, कुणाला ही संशय न येणार अश्या आल्या आणि बाईक वर बसून आम्ही निघालो...मॅडम रडतच मला मागून मिठी मारून बसली.
मी - मॅडम, तुम्ही माझं एक ही कॉल, किंवा मेसेजचं रिप्लाय ही दिलत नाही, किती मिस केलं माहिती आहे तुम्हाला, जर आज आलो नसतो, तर कायमचं गमावलं असतं मी तुम्हाला.
मॅडम - (रडत) मला हे लग्न करायचंच नव्हतं कारण सर्व मैत्रीणी म्हणत होत्या, की तो चांगला नाहीये पण घरच्यांच्या इच्छे खातर...आणि मी तुला रिप्लाय द्यायचं ठरवलेलं पण तू माझ्या पेक्षा लहान आहेस, बाकीचे काय म्हणतील ह्यातच मी हरपले होते. तु गेल्या पासून माझं तिथे मन ही लागत नव्हतं मी ती नोकरी ही सोडली.
मी - निधी, आता रडायचं नाही हा!!
(मी माझ्या ऑफिस च्या मित्र, मैत्रिणीनं कळवले की मी लग्न करतोय आता, मला तुमची गरज आहे, तुम्ही हार वगेरे साहित्य घेऊन या, आणि नंतर मी आणि निधी ज्वेलरी च्या दुकानात मंगळसूत्र घ्यायला गेलो. माझ्या कडे होते पैसे, त्या पैशाचं ते मी घेतलं.
वया चं अंतर फक्त ३ वर्षच होतं, पण दिसायला निधी माझ्या सोबतचीच वाटत होती.
आम्ही देवळात पोहचलो, सर्व जण आलेले, मैत्रिणींने निधी ला जवळ घेतले होते, आणि मी मित्रांच्यात.
आमचं लग्न झालं, निधी च्या चेहऱ्यावर हसू आले होते, आणि तेच मला हवं होतं...सध्या मी जिथे राहत होतो ते भाड्याने होते, निधीला ला ही जॉब मिळाला होता.
सो आम्ही, नवीन घर घेण्याचे ठरवले, आम्ही लोन वर २bhk घर घेतलं, सोबत जोड्याने गृहप्रवेश केलं.
आता खूप समाधान वाटत होतं, सर्व मनासारखं होत चाललं होतं.
पण मला असं वाटत होतं की निधी ला तिच्या आईबाबांची आठवण येतेय. त्या दिवशीच्या रात्री मी आणि निधी एकाच ब्लँकेट मधे एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.To Be Continued...