#नाती_जपतांना - कथा २८

8 1 0
                                    

बाबा, मी मदर्स डे करता, आई साठी सरप्राइज ग्रिटिंग कार्ड बनवलय. कसं आहे?


वा, वा खूप छान!!! आई करता हे सरप्राइज आहे ना, चल मग आपण तिच्या आवडीचे आईस्क्रीम पण मागवू या... (फक्त आई मुलांचं नातं, हे प्रत्येक नात्यापेक्षा ९ महिने जास्त असतं.)


गप्पा मारताना मुलाने विचारले, ए बाबा, तू काय द्यायचास रे आजी ला गिफ्ट नि सुमितचे मन 'टाईम मशीन' सारखं वेगाने मागे मागे धावायला लागले....


त्या वेळी असले कोणते व्यक्ती विशेष दिवस माहीत ही नसायचे.. पण हा, आईच्या प्रत्येक वाढदिवसाला, कळायला लागलं तेव्हा पासून तो स्वतःच्या पौकेटमनी मधून आईच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा वा कधी वडापाव/ आईस्क्रीम कप नक्की आणायचा.


महिना ५०० रुपये पगार कमवायला लागल्यावर त्याने आई करता एकदा आपल्या पसंतीची साडी गिफ्ट आणली होती. (त्याच्या आईचा त्या साध्या सुती साडी वर विशेष जीव होता..) वय वर्ष २२ मधल्या त्याच्या मनातल्या, आईला दिलेल्या गिफ्ट निमित्तच्या ह्या मोजक्याच सुखद आठवणी...‌


(हो, सुमितच्या आईला जाऊन १५ वर्षे झाली पण काही क्षण, शब्द, आठवणी हे आयुष्यभर हृदयात कोरलेले राहतात..)


'आई, तू ठिक आहेस ना?,' असे विचारताच फक्त डोळ्यांतून ती 'हो' म्हणाली नि प्रसन्नपणे किंचितशी हसली. पत्रिकेत लिहिले होते तसे, 'सर्व सुख भोगणारा, अंतिम सुखी मातृभक्त' सुमित आपल्या आईच्या पायाजवळ बसला होता.. ही त्याची, आईबरोबरची शेवटची जिवंत आठवण... (आईसीयू मध्ये गेलेली त्याची आई परत बाहेर आलीच नाही!)


सर्व-श्रेष्ठ नात्याची एक (अधुरी) गोष्ट!! समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang