त्या दिवशीच्या रात्री मी आणि निधी एकाच ब्लँकेट मधे एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.
इथून पुढे...त्या दिवशीच्या रात्री मी आणि निधी एकाच ब्लँकेट मधे एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.
आणि रोमांस करत करत कधी २:३० वाजले कळलंच नाही.
सकाळ झाली...निधी लवकर उठून सर्व आवरून, ड्रेस मधे, केस पुसत अगदी सिनेमा सारखं उठवायला आली,
अहो.. उठा..
किती वाजलेत पहा जरा, काल मला झोपून दिलं नाहीत आणि आता बघा कसे झोपलेत.
निधी ने ब्लँकेट खेचलं..
अहो चला उठा...
मी डोळे हळू हळू उघडत.. काय ग निधी झोपू देत ना.निधी - उठा नाहीतर फटके देईन कळलं, लग्न मास्तरीन बाईं सोबत केलंयत कळलं.
मी - (हसत म्हणालो)हो का काल कसे फटके दिले, मास्तरीन बाई विसरलात वाटतं.
निधी - (हसत) हो हो बस झालं, दात काढणं उठा आता आणि जावा अंघोळ करा.
मी - एकटाच..
निधी - हो एकटाच!! मी केली आहे..
मी - मी नाही मग... करत मला कंटाळा येतोय...
निधी - उठतोस का.. की....
मी - नाही नाही.. चाललो...
निधी - हा.. अंघोळ कर मी नाष्टा करते.. हा.
मी अंघोळ करून उघडा, टीशर्ट घालायला जात असताना निधी, किचन मधे नाष्टा करत होती, हे पाहून माझी पावलं किचन कडे वळली. मी निधीच्या जवळ जात केस मागचे पुढे नेले, मागे मानेवर किस करत, मागून मिठी मारली.
निधी - अहो सोडा ना.. नाष्टा बनवुद्यात ना..
मी - वाह, काय स्मेल्ल आहे...
निधी - कसलं नक्की... हा!!!
मी - (हसत) कांदेपोहे..
निधी - हा हा जावा कळलं.., जावा गप हॉल मधे जाऊन बसा मला नाष्टा बनवूद्यात, नाहीतर काही मिळणार नाही कळलं.
मी - काहीच मिळणार नाही??
निधी - हो काहीच मिळणार नाही..
