माझी बायको निधी, आम्ही ३ अठवड्यांपूर्वी लग्न केलं.
हे बोलताच आई निधी कडे बघत बसली, आणि बाबा माझ्याकडे.
आणि आम्ही दोघे मान खाली घालून स्तब्ध होतो...
इथून पुढे...बाबा लगेच जोरात आवाजात, कुणाला विचारून लग्न केलंस, आमची एकदाही काही गरज भासली नाही तुला..
मी - अहो बाबा ऐकून तरी घ्या ना..
बाबा - काय!!! ऐकून घेऊ? हा!! इतका मोठं घर झालं तुझं, गृहप्रवेश वगेरे केलंस तेव्हा ही आठवण नाही पडली का रे रे रे!!!!!
त्याच वेळेस निधी आई च्या बाजूला बसत म्हणाली,
आई खरंच आमचं चुकलं, हे इतक्या घाईत घडलं की आम्ही देवळात लग्न केलं, आणि आमचं दोघांचं ही एकमेकांवर जीवापार प्रेम आहे, माझ्या आई बाबांनी तर संबंध तोडलेच आहेत, तुम्ही नका ना तोडू...
आई बाबा आमच्या बरोबरचं नातं
(निधी रडत म्हणाली)बाबा - पण तुम्ही हे चुकीचं वागलात पोरांनो, असं काही होतं तर एक फोन तरी करायचं ना.
मी - बाबा खूप होती, पण जर नाही म्हणाला असतात तुम्ही तर... ह्याची जास्त भीती वाटत होती मला.
बाबा - मग हिच्या घरचे?
मग मी पूर्ण घडलेली हकीकत सांगितली, आणि हे ही सांगितलं की निधी माझी मॅडम होती, आणि माझ्याहून ३ वर्षांनी मोठी आहे, पण मी तसलं काही मानत नाही आणि आम्ही नाही राहु शकत एकमेकांशिवाय बाबा नाही राहू शकत.. (रडु लागलो होतो बोलताना)
बाबा बाजूला येत, म्हणाले ठीक आहे, पण मला हे अजिबात नाही आवडलंय.. पण ठीक आहे प्रेम करता ना असेच करत रहा, आमचं काहीही विरोध नाहीये.
निधी ने आई ला मिठीच मारली, आई ही प्रेमाने थोपटत म्हणाली,आई - मला माझी सून पसंद आहे, हा!!
हे बोलताच
आम्ही दोघांनी उठून, पाया पडत आई बाबांचं आशीर्वाद घेतलं.बाबा - विनय, मी उद्या घरी जाऊन मुहूर्त काढतो लग्नाचं तुमच्या.
मी - का बाबा? ते तर झालंय..
बाबा - अरे लोकं नावं ठेवतात, असं कुणाला कळलं तर, त्यामुळे आपण लग्न गावी मोठ्या धुधडाक्यात लावून देऊ.