निधी च्या आईंना पत्ता दिलं आणि मी घरी यायला निघालो.
इथून पुढे...वाटे मध्ये हॉटेल मध्ये जेवण केलं, आणि घरी जायला निघालो, संध्याकाळचे ५ वाजत आलेले, निधी च्या कॉलेज ला जाऊन तिला पिकअप केले.
घरी जाऊन निधी ला सांगितलं की उद्या सुट्टी घे ना कॉलेज ला..निधी - का.. ओ?
मी - काहीतरी सरप्राइज आहे तुझ्यासाठी...
निधी - अय्या!! खरंच..
मी - हो.. मॅडम
निधी - ठीक आहे उद्या कॅन्सल...
मी - येस्सस...
निधी - पण सरप्राइज काय आहे?
मी - सांगायचं असतं तर अगोदर नसतं सांगितलं.. सब्र करो बेबी.. (हसत म्हणालो).
निधी - जा बाबा, मला नाही. बोलायचंय तुमच्याशी
असं बोलून निधी उठून चेंज करायला जाऊ लागली मी तितक्यात तिचं हात धरलं.निधी - अहो सोडा!!
मी - मला नाही सोडायचंय.
निधी - मी ओरडीन जोरात कळलं....
मी - हा ओरड की, शेजारच्यांना कळेल की काय चालू आहे आपलं... (हसत म्हणालो)
निधी ही हसत म्हणाली काय चालू आहे तुमचं...
मी - एक किस? प्लिज फक्त एकच??
निधी - नो नो नाही हा...
असं निधी बोलली आणि मी निधी ला उचलली...
निधी - अहो, काय सोडा पाडाल मला,
मी असं कसं, गपचुप बस, आणि आम्ही बेडरूम मधे आलो निधी ला बेड वर ठेवली आणि मी निधी च्या जवळ जाणार इतक्यात बेल वाजली,
मी - शिट यार... आता कोण नेमकं.
निधी - जा जा, पहा जा.. (हसत म्हणाली)
मी - हा हा..
थोडं वैतागत गेलो, आणि दरवाजा उघडलं तर निधीचे आई बाबा!!!
मी बाबांसोबत नजर नाही मिळवू शकलो,
निधी ची आई - जावई बापू, तुम्ही निघालात आणि ते कामावरून आले आणि मी सर्व सांगितलं त्यांना, त्यांना राहवलंच नाही, लगेचच आम्ही निघालो.