पार्ट ६

2.4K 9 2
                                    

आता फक्त ४ दिवस राहिलेले लग्नाला...
आमचं लग्न पुढच्या भागात...
इथून पुढे...

दिवस सरत गेले, कधी हळदी समारंभ आला कळलंच नाही, माझे सर्व मित्र मैत्रिणी आलेले, म्हणू लागले होते, आम्हाला वाटलेलंच, नक्कीच काहीतरी चालू आहे तुमचं, सोबत फिरायला काय जायचात, सोबत बसायचात काय काय,
मी लाजत हसतच होतो.

खूप जलोषात समारंभ झालं, रात्री नाचणं, गाणं झालं.

रात्री निधी ला फोन केलं,

निधी - हॅलो

मी - हॅलो, आवरलं का गं तिकडे..

निधी - हो अताच, आई गं दमले, मी आज अहो..

मी - माझं पिल्लू दमलं होय.

निधी - हा ना..

मी - निधी खूप खुश आहे मी..

निधी - मी ही, उद्या लग्न, काश मला असं वाटतंय की आता तुझ्याशी भेटावं.

मी - काही नाही हा शोनू, उद्या पासून सोबतच आहोत आपण हा..

निधी - हा.. लव्ह यू..

मी - लव्ह यू टू.. निधी

निधी - चला आता झोपा, उद्या लग्न आहे आपलं, कळलं ना, मस्त ॲक्टिव पाहिजे मला माझा नवरा कळलं ना..

मी - (हसत म्हणालो) हा..

बाय बाय..असं म्हणत आम्ही फोन ठेवला...
पण मला निधी ला भेटायची खूप इच्छा झालेली, घड्याळात १ वजेलेले, मग सर्व अंदाज काढलं की निधी च्या घरी आपण गेलो, तर किती वेळ लागेल यायला परत, सकाळी ६ पर्यंत तर नक्कीच येईन मी..
मी माझ्या आत्याच्या मुलाला संकेत ला सांगितलं, की असं असं मला इच्छा होत आहे निधी ला भेटायची आपण जाऊन येऊयात, कारण त्याच्याकडे कार होती.

संकेत - अरे पण वाजलेत किती उद्या उठायचं आहे,

मी - अरे काही नाही जाताना तू झोप येताना मी झोपतो.
असं त्याला पटवून आम्ही निधी कडे रात्री निघालो, जाताना मी गाडी चालवत होतो, रात्रीची रस्त्याला कुठलीही वाहतूक नसल्यामुळे दीड तासातच तिच्याकडे पोहचलो, ३ वाजलेले.
बाहेर लाईट चालू होती, कसलं तरी काम चालू होतं कारण शेवटी लग्न घर आहे, कोण ना कोण काहीतरी कामं करतच असतो.

मॅडम आणि मीWhere stories live. Discover now