तिने बाजूचं झाडू घेतलं आणि माझ्याकडे आली.
मी - अगं निधी... काय करतेस... लागेल न ते..
निधी - लागुंदेत, आता कळेल तुम्हाला लग्न मॅडम सोबत
केलंयत तुम्ही..
मी एक फटका खाऊन हसत खाली आलो...
निधी - थांबा तुम्हाला सांगतेच आता...To Be Continued...
इथून पुढे..
निधी धावत माझ्या मागे खाली आली, आणि धावता धावता तिचं पाय सरकलं आणि ती पडणार मला वाटलं, मी थोडं मागे सरकत तिला अलगद माझ्या हातात पकडली, माझी नजर तिच्या मधे, तर तिची नजर माझ्या मधे, निधी लाजली आणि तिने डोळे बंद केले, तेवढ्यात पुन्हा सोनू ने पाहिलं, तर तिने फोटोच काढलं आमचं, मला कळालं कारण तिच्या फोन ची फ्लॅशलाईट ऑन होती.
मी लगेच भानावर येत, निधी ला नीट सरळ उभी केली.
सर्व जण बघतच बसले, निधी लाजत वर पळाली.
आता आम्हाला पुण्याला जावं लागणार होतं, कारण जवळपास आठवडाभर सुट्टी मिळाली होती.
आम्ही पुढच्या दिवशी पुण्याला जायला निघालो, आता आम्ही खरोखर नवरा बायको म्हणून होतो, आता आम्ही येवढे दिवस सुट्टी काढली होती, आता सुट्टी मिळणं मुळीच शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही सोबत पहिल्या सारखे कामाला जाऊ लागलो.
तिच्या नवीन मित्रिणी झाल्या कॉलेज मध्ये, त्यांना निधी ने घरी ही आणलेलं घर दाखवायला, त्यांना आमचं कसे जुळले हे देखील सर्व सांगितलं होतं तिने.असच २ आठवडे निघून गेले,
आता आम्ही दोघे ही सेटल्ड झालो होतो.
सकाळी ऑफिस, ऑफिस वरून आल्यावर जिम, जिम वरून आल्यावर जेवण, झोप हे माझं रूटीन होतं.
एके दिवस मी, ठरवलं की मी आणि निधी ने बरेच दिवस मन भरून रोमान्स नाही केलं, सो
एके दिवशी मी लवकर ऑफिस मधून हाल्फ डे निघून, मस्त पैकी एक शॉर्ट नाईटी, फुलं, तिच्या साठी गजरा..
घेऊन तिच्या आधी घरी पोहचून, बेड फुलांनी सजवलं.
सर्व नीट करून तिला आणायला गेलो.
मी - निधी आज तुझ्यासाठी काहीतरी सरप्राइज आहे..
निधी - काय ते?