घड्याळात दुपारचे ४ वाजले होते.
मी आणि दिव्या एकमेकांसोबत बिनधास्त गप्पा मारत होतो,
दिव्या म्हणाली की तिला खूप भूक लागली आहे, तेव्हा ती म्हणाली आपण आता बेस्ट फ्रेंड्स आहोत ना तर आपण बाहेर जाऊयात का खायला काहीतरी.
मी तर दिव्याला वचन दिलेलं की मी बेस्ट फ्रेंड्स ची सर्व कर्तव्य पार पाढेन.
मग मी नाही म्हणू शकलो नाही, आणि आम्ही दोघे ही बाहेर एका कॅफे मध्ये गेलो.
तिथे सर्व कपल्स बसलेले, एकमेकांच्या हातात हात ठेवून, गळ्यात हात घालुन.
मी आणि दिव्या ने पिझ्झा, आणि रेड वेलवेट केक मागवलं, सर्व जण एकमेकांत गुंतले होते हे पाहून तिला ही कसं तरी वाटलं तिने माझं हात हातात धरलं.
मला कळत होतं फ्रेंड्स आहे हे सर्व चालतं.
तिने माझा फोन मागितलं, मी दिलं, तिने माझ्या इंस्टाग्राम वरून तिच्या नवऱ्याचा अकाउंट शोधलं आणि स्टोरी पाहिली, कारण त्याच्यावरून त्याने तिला ब्लॉक केली होती.तर तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, मी लगेच म्हणालो..
अगं रडते का तू...आणि तिने मला फोन दाखवला,
त्यात तिचा नवरा आणि ती बीच वरती शॉर्ट कपड्यानमध्ये एकमेकांना चिकटून असा फोटो होता.
आणि खाली कॅप्शन मध्ये "माय लव्ह" असं होतं.मी त्याला लगेच ऑर्डर कॅन्सल करायला सांगितली आणि बाहेर पडलो.
ती बाहेर तशीच रडत होती, तिच्या समोर जाऊन तिचं चेहरा दोन्ही हातात पकडुन अश्रू पुसले.
आणि मिठीत घेतले.मी - शांत हो दिव्या शश शांत हो...
असं म्हणत तिला शांत करत होतो.
आम्ही मग गाडी मध्ये बसून, मी तिला समजवू लागलो.मी - अगं तू रडते कश्यला, मी समजू शकतो तुझ्या भावना पण.. तू खचू नकोस, तो तिकडे तुला जळवायची कोशिश करतोय. तू ही त्याला प्रती उत्तर दे.
दिव्या - (रडत म्हणाली) कसं काय माझं कोण आहे...
मी - मला बेस्ट फ्रेंड मानलयेस ना. मी आहे तुझ्यासोबत ठीक आहे.