बदला (भाग 4)

206 1 0
                                    

रात्री बराच वेळ मला झोप येईना. हे काय आहे तेच काही केल्या मला उमजेना. मी खुप उलट सुलट गणिते मांडून पाहिली. माझी क्षणाक्षणाला भडकणारी पण अचानक शांत झालेली बायको तिचा त्या स्कुटरवाल्याबाईशी काही संबंध असेल का? मला कधी झोप लागली कळलेच नाही. उठलो तेंव्हा सकाळचे नऊ वाजून गेले होते. तसाच ताडकन उठलो. घाई घाईत आवरून ऑफिसकडे पळालो.

संध्याकाळी काम आटपल्यावर मी चहा मागवला. एक सिगारेट शिलगावली आणि मग मला आठवण झाली आता ती येडी म्हणजेच स्कुटरवाली थांबलेली असेल. पीडायला येईल मग लॉन्गड्राइव्ह....

आता मात्र मी शहारलो. कोण असेल तो लांडगा, त्याचे ते लाल झालेले डोळे. तो आपल्या गाडीसमोर का आणि कुठून येतो? त्याला पाहिल्यावर ती स्कुटरवाली का घाबरते? गाडी अंगावर घाल का म्हणते? आणि अंगावर गाडी घातल्यावर तो डाव्याच बाजूला का पाळतो. परत आल्यावर तिच्या स्कूटर जवळ जंगली कुत्री का असतात? ती का घाबरते आणि मी हाकालल्यावर का पाळतात?

नुसती कोडी.. ती पण भयानक.. कशाचा कशाला मेळ नाही. कडी म्हणजे माझ्या बायकोला ती भेटल्यावर स्मशानातला वास कसा येतो?

माझ्या हाताला सिगारेटचा चटका बसला आणि मी भानावर आलो. बोटांपर्यंत सिगरेट नुसती जळत आली होती. मी पटकन ती एश ट्रे मध्ये टाकली. पहिले तर समोर ठेवलेला चहा थंडा होऊन गेला होता.

मी ऑफीसमधून बाहेर आलो. पार्किंगमधून गाडी बाहेर काढली. काय करावे कळेना. आज ती पण भेटायला नाही आली. माझ्या अगदी खास मित्राला फोन केला. हॅलो काय करतो आहेस.

काही नाही बसलोय.

मग ये चंद्रलोक बारमध्ये. मी पोचतो.

ओके भाय मी पण पोचतोच.

मी पोचलो. तो ही वेळेवर आला. काय घेणार?

आपली रम बाबा विथ थम्स अप आणि सोडा.

ऑर्डर दिली. लगेचच दोन ग्लास निब आणि थोडा चकणा आला. मी सिगारेट काढली त्याला दिली. दोघांनीही मस्त झुरके मारले. चियर्स केलं. तो माझ्याकडे टक लावून पहात होता.

बदला Onde histórias criam vida. Descubra agora