पार्ट - १२

1.5K 8 1
                                    

आणि समोरून दरवाजा उघडलं..
समोर पाहतोय तर...
सुषमा...
इथून पुढे....

मी - सुषमा तू.. तू मला मेसेज केलंस...

सुषमा - हो या आत..
(मी आश्चर्य होत आत आलो तिने दरवाजा बंद केला)

मी उभा राहतच विचारले काय झालंय...

सुषमा - मी मुद्द्यावर येते.. मला तुम्ही आवडायला लागला आहात, जसं तुम्ही दिव्याबरोबर राहता तसं माझ्या सोबत रहा हेच सांगायला मी तुम्हाला बोलावलं आहे.

मी - (भडकून) अरे तुम्हाला काही कळतंय का!!!

माझं लग्न झालंय... बायको आहे मला...

सुषमा - मग दिव्या?

मी - काय दिव्या??

सुषमा ने मला फोटोज् दाखवले, मी विचारात पडलो हे फोटोज् हिच्याकडे कसे काय.. मी फोन घ्यायचा प्रयत्न केला पण तिने फोन सावरला.

मी - का तुम्ही सर्व माझ्यामागे लागल्यात मला ह्या सगळ्यांमधून बाहेर पडायचंय, पाया पडतो तुझ्या.. मला सुखाने राहू द्या प्लिज...

लाख समजावण्यानंतर, ती ही काही नाही बोलली आणि माझ्यासमोर तिने फोटोज् ते डिलीट केले.

मी - सुषमा थँक्यू.. तुला हवं तर मी बेस्ट फ्रेंड राहीन तुला साथीदाराची कमी नाही भासवून देणार, फक्त आता मला निधी सोबत वेळ घालवायचं आहे...

सुषमा - हो.. मी समजू शकते तुम्हाला तिला जास्त वेळ द्यायला हवं, खरं सांगू की तुम्ही दिव्यापासून दूर व्हा..

मी - हो सुषमा मी ही तोच प्रयत्न करतोय, पण काय कसं करू कळतंच नाहीये मला...

सुषमा - तुम्ही आता जास्त निधीला वेळ द्या दिव्याला अशी जळवा की तिला कळलं पाहिजे कोण जास्त तुम्हाला गरजेचं आहे, तिच्याकडे लक्ष देणं बंद करा..

मी - थँक्यू सुषमा.. कळालं मला.. मला नक्की काय करायचं आहे ते... मी येतो आता..

सुषमा - चहा तरी पिऊन जा..

मी - नको नंतर कधीतरी नक्की...

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 27, 2024 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मॅडम आणि मीWhere stories live. Discover now