01

1.3K 6 10
                                    

परिस्थिती पुढे सर्व जण हतबल असतात. आर्थिक समस्या मधुन बाहेर पडण्यासाठी नेहमी सर्व जण अनैतिक तेचा सरळ सोपा मार्ग निवडतात. क्षणिक वेळासाठी हा मार्ग सुखकर आणि सहज वाटतो. पण पुढे हाच मार्ग खडतर आणि कठीण होत जातो. मायाजाल च्या दलदल मध्ये फसलेल्या मानवी आयुष्यात त्यातून निघण्यासाठी धडपडत असतो. पण त्याची हिच धडपड त्याला अजून या मायाजाल मध्ये अडकवत असते. परिस्थिती पुढे हतबल अरुण नावाच्या तरुणाची कहाणी आहे.

नुकताच जवानी मध्ये प्रवेश केलेला अरुण. दिसायला देखणा, सुंदर राज बिंड. कॉलेज च्या पोरी अगदी फिदा होत्या त्याच्या वर. पण अरुण ला आपल्या खांद्यावरील जबाबदारी चे भान होते. म्हणून तो या सर्व बंधनातून दुरच होता. फक्त अभ्यास आणि भविष्य चा मनात विचार. आपल्या या जबाबदारी च्या साधनेत कधी पण तो भटकला नाही. पण नियती ने त्याच्या वर एक क्रुर आघात केला. आणि अरुण चे सर्व आयुष्य बदलून गेले. त्याच्या वडीलांच्या निधनानंतर अरुण वरती अजून च गहरे संकट उभे राहिले. दोन वेळ च्या अन्ना साठी त्याला खूप धडपडत राहावे लागत असे. त्या तुन हे महागडे शिक्षण घेणे त्याला परवडत नव्हते. शेवटी या आर्थिक तंगी मधुन स्वतः ला बाहेर काढण्यासाठी त्याने शिक्षण सोडले आणि शहराची वाट धरली.

अरुण शहरात त्याच्या काका कडे राहायला आला होता. अरुण चे काका सखाराम एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये सेक्युरिटी चे काम करत होते. अरुण नवीन शहरात आल्या मुळे त्यांनी सोसायटी मध्ये गाडी धुणे, दुध टाकणे, कोणाच्या तरी घरची साफसफाई करणे हे काम दिले. त्यातून अरुण ला ठिकठाक आमदनी होत होती. पण हे त्याच्या साठी पुरेसे नव्हते. शिकलेला अरुण शिकवणी सुध्दा घेऊ लागला होता. एकंदरीत अरुण चे आयुष्य चांगले चालत होते. शहरातील झगमगाडीत अरुण चे मन हळूहळू रमत होते. पण हे एक मायाजाल आहे. ह्याचे अरुण ला भान नव्हते. जगमगत्या शहराच्या बुडाखाली किती काळोख आहे. हे लवकरच अरुण ला कळणार होते.

काकाची नाईट शिफ्ट असल्या वर अरुण त्यांच्या साठी जेवण घेऊन जात होता. अशाच एके दिवशी अरुण जेवण घेऊन गेला असता. अचानक गेट वरती एक भली मोठी गाडी येऊन थांबली. बहुतेक BMW असावी. गेटच्या बाहेर ती गाडी बराच वेळ थांबली होती. काय भानगड आहे हे पाहण्यासाठी सखाराम ने अरुण ला बाहेर पाठवले. चपाती चा तुकडा खात सखाराम सेक्युरिटी कॅबीन मधुन अरुण ला पाहत होता. अरुण गेट जवळ पोहचताच गाडी चा दरवाजा उघडला आणि त्यातून एक चाळीस वर्षे वयाची एक बाई बाहेर पडली. अंगावरती काळ्या रंगाच्या सिल्क साडी मध्ये त्या बाईचे गोरे पान यौवन उठून दिसत होते. मखमल च्या ब्लाऊज ज्या वरती तिचा सिल्क चा पदर सारखा खाली पडत होता. या वयात बायकांचे शरीर ओबडधोबड असते. पण त्या बाईची काया कामुक होती. जणू काही स्वर्गातून एक अप्सरा आपल्या सौदर्य ची उधळण करायला आली असावी. अरुण त्या बाईच्या सौदर्य चे दर्शन करत मग्न होऊन उभा राहिला. या पुर्वी स्री चे असे रूप त्यांने कधी पाहिले नव्हते. गावात आपल्या हलाखीच्या परिस्थिती तुन तोंड वर काढून त्यांने कधी हि स्री चा या रुपाकडे पाहिले नव्हते.

मायाजालOù les histoires vivent. Découvrez maintenant