' चाबऱ्या ' भाग ५

2.5K 6 0
                                    

_________________________________________________

' कसं करू आता.... हिनी बोभाटा केला तर सुभानराव मारून टाकत्याल मला ! माह्या पोरांचं तर...... आयोव....'

सुशाला पुरती बिथरली. तिला काय करावे तेच कळत नव्हते.

ती गोदाजवळ जाऊन बाजुला गुडघा टेकवुन बसली. गोदा जोराजोरात रडत होती. सुशाला ने तिचे उघडे असलेले स्तन पाहिले. लगेच तिने तिच्या झम्परचे हुक लाऊन घेतले.

गोदाही सुशालाच्या छातीवर डोके ठेवून रडु लागली. सुशाला तिला कुरवाळत शांत करत होती. पण आतुन माञ ती भलतीच घाबरली होती.

"शांत हु गं बाय... आवर आता सवताला... गावात पार आब्रु बी राहीची न्हाय आपली...."

सुशाला असं बोलताच गोदा तिला एक रागीट कटाक्ष देऊन बोलली,

"आपली...?."

सुशालाला शब्द फुटत नव्हते. कारण अख्ख्या गावात जिच्या स्वभावाची गोडवी गायली जायची, त्या गावाला हे प्रकरण कळले तर सुशालाला तोंड दाखवणे सुद्धा मुश्किल होईल हे तिला समजुन चुकले.

" बया..... काय करुन बसले म्या...!" डोक्यावर दोन्हीं हात आपटत सुशाला थरथरू लागली. आता तिच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले.  तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती.

गोदा उठली. तिच्या रागीट डोळ्यांतुन पाझरणाऱ्या अश्रूंनी, तिला आतुन किती यातना होताहेत हे सुशालाला दाखवुन दिले होते. त्यामुळे सुशालाला सुद्धा पश्र्चाताप होऊ लागला.

गोदाची पावले जणु तिच्या मनाप्रमाणेच जड झाली होती..... कवाडापर्यंत जाताना तिचे पायही लटलटत होते. कारण तिला झालेल्या प्रकारामुळे स्वतःचीच किळस आली होती.

तेवढ्यात खुराड्यातल्या कोंबड्यांची फडफड तिच्या कानावर पडली आणि तिची पावले जमिनीलाच खिळून बसली.. ती हात कपाळावर मारत पुटपुटली,

" महा...ल ल ल्योक..... उपाशी..."

आत्ताशी तिला तिच्या मुलाची आठवण आली होती. बराच वेळ होऊन गेल्याचं लक्षात आल्याने तिने क्षणाचाही विलंब न करता खुराड्याला लाथ मारली. कोंबड्या फडफडत गोंधळ करत बाजुला झाल्या. दोन अंडी घ्यायला आलेली गोदा माञ सुशालाला न विचारताच तिथले ५-६ अंडे पदरात घेऊन तडक बाहेर पडली.

' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेसМесто, где живут истории. Откройте их для себя