एक मुलगी धरणकाठी बसून रडू लागली. तिने एक दगड उचलला आणि पाण्यात फेकला. आणि सांगू लागली.
"आज नाही तर उद्या तुला यावं लागेल वेद !!”.
तेवढ्यात हृषिकेश आला आणि तिचे अश्रू सावरत म्हणाला.
" पोरकस पणा सोडून दे.हरवलेली वस्तू आपल्याला भेटेल पण नष्ट झालेली.....”
तेवढ्या ती जोराने ओरडू लागली. हृषिकेश म्हणाला.
" चल आता बस झाल.”2 वर्षापूर्वी.....
शाळेची घंटा वाजली. नेहमी प्रमाणे मुले आपल्या घरी जाऊ लागली. मात्र एक मुलगा धरणाच्या दिशेने जाऊ लागला. आणि त्या पाठोपाठ एक मुलगी पाठलाग करू लागली. वेद धरण काठी गेला आणि एक दगड उचलून पाण्यात फेकला. आणि घरच्या दिशेने जाऊ लागला. पिया मध्येच आडवल आणि म्हणाली.
" काय रे !! वेड्या तुला अक्कल नाही आहे का ? हे काम करायला तू येवढ्या लांब येतोस. ”
वेद हाताने इशारे करत सांगतो. ( वेद हा मुलगा मुका असतो )
" Awawwaawa........"
त्यातच पिया बोलली ....
" माफ कर पण मला ऐकता येत नाही. ”
वेद आपली वही काढतो आणि त्यावर लिहितो. मला बोलता येत नाही. पण मी ऐकू शकतो.
पिया म्हणाली.
" बरं .....”
पिया वेडकडून वही घेते आणि त्यावर लिहते.मला पण ऐकू येत नाही पण बोलू शकते.
वेद तिच्या कडून वही घेतो आणि त्यावर लिहितो. अग येडी तुला बोलता येत आणि मला ऐकता येत तर तू बोल मी ऐकतो.
पिया म्हणाली.
" अरे देवा मी तर वेडीच आहे . माफ कर ह, पण आपली जोडी खूप भारी जमेल माझा मित्र होशील का? ”
वेद वही वर लिहितो,"हा”.