विशाल च्या मिठी मध्ये आपुलकी ची ऊब मिळताच माधुरी ने त्याच्या समोर आपली सर्व चुका कबुल केल्या होत्या. विशाल ने तिची सर्व कहानी एका पोलीस अधिकारी म्हणून आणि एक खास मित्र म्हणून दोन्ही बाजुनी ऐकली होती. माधुरी चे जग्गु बरोबर चे शारीरिक संबंध हे काही प्रेम नसुन... एका क्षणाचा लैगिक आकर्षण होते. हि गोष्ट तो लगेच समजला आणि त्यांने हि गोष्ट माधुरी ला देखील पटवुन दिली. शिवाय झालेला सर्व प्रकार एकदा मंदार च्या देखील कानावरती घालण्याचा विशाल ने माधुरी ला सल्ला दिला होता. विशाल च्या मते इतर कोणा कडुन हि गोष्ट समजल्या वरती मंदार ला जितके दुख होईल. कदाचित माधुरी च्या कडुन कळाल्यावर त्याला कमी त्रास होईल या गोष्टी चा...
पण माधुरी ने विशाल ला विश्वास दिला होता की, योग्य वेळ आल्या वरती ती नक्की मंदार ला सर्व समजुन सांगेल आणि यावरती तो जो काही निर्णय घेईल. ते माधुरी ला मान्य होते. शेवटी अपराध हा अपराध असतो. तो चुकुन होऊ दे... नाही तर भावना च्या ओघात... त्याची क्षेणी सारखी असते. फक्त समोरचा त्याच्या मनातील त्या वेळची परिस्थिती समजुन क्षमा देऊ शकत होता. हि गोष्ट माधुरी ला विशाल बरोबर बोलताना लक्षात आली होती.
أنت تقرأ
लाल इश्क
عاطفيةहि कथा आहे माधुरी नावाच्या एका सुसंस्कृत समाजा मधुन येणाऱ्या गृहिणी आणि अनपेक्षित तिच्या आयुष्य मध्ये आलेल्या एक गुंड जग्गु यांची... आपल्या क्षणिक सुखासाठी माधुरी जग्गु सोबत शारीरिक संबंध बनवते आणि तिच्या शारीरिक आकर्षण वरती प्रेम करण्याऱ्या त्या गु...