मॉन्स्ट्रोसिटी - भाग 8

58 0 0
                                    

आपण ज्याच्यावर हल्ला केला ती भुतावळ नसुन आपलाच डेव्हिड होता हे समजल्यावर तिघांच्याही मेंदुला पॉवरफुल विजेचा झटका बसल्याची जाणीव झाली. हे आपण काय केले असा विचार मनात येत होताच तेवढ्यात मोनिका अतिव दु:खाने चित्कारत जोराने रडु लागली. इतर दोघींची सुद्धा तीच अवस्था होती.

डेव्हिडssss.... - मोनिकाच्या तोंडुन आर्त किंकाळी फुटली.

पण... पण डेव्हिड आपल्याला काहीच कसे बोलला नाही? - सारा

त्यावर सोफिया ने स्वत:ला सावरत डेव्हिडचा चेहरा आपल्या बाजुने वळवला. ती आता थोडे निरखुन पाहत होती, आपल्या हातांच्या बोटांनी तिने डेव्हिडचे रक्ताने भिजलेले ओठ उलगडत त्याचा जबडा ओपन केला. आत जीभच नव्हती.

त्या नराधमांनी याची जीभ कापून टाकलीय - सोफिया आता रागाने थरथरत होती. मोनिका डेव्हिडच्या छातीवर डोके टेकवुन हुंदके देऊ लागली.

त्यांनी डेव्हिडची जीभ कापून चेहरा झाकला, त्याचे हात सुद्धा बांधले, आणि त्याला आपण जिथे विश्रांती घेत होतो त्या दिशेला मुद्दाम पाठवले. जेणेकरुन आपण हा डेव्हिड नाहीये असे समजुन यावर हल्ला करावा. - सोफिया ला आता त्या भुतावळींचा पुर्ण डाव लक्षात येत होता.

तिनही मुली अजुन स्वत:ला सावरणार, तितक्यात एका भुतावळीचा किरट्या आवाजात हसण्याचा आणि त्या पाठोपाठ रागाने मोठ्याने ओरडल्याचा कर्णकर्कश ध्वनी त्यांच्या जवळ येऊ लागला. तिघी मुली जिवाच्या आकांताने डेव्हिडला त्याच अवस्थेत सोडुन पळायला लागल्या. वाट दिसेल तिथे पळत त्या इमारतीच्या बेसमेंट मधील भागात आल्या. बेसमेंट मधुन इमारती बाहेर जाण्यास एकच दरवाजा होता. त्यावर मोठमोठ्या लोखंडी साखळ्या लावुन ती वाट कायमची बंद केली होती. खिडक्यांवर लोखंडी सळ्या होत्या. तिथुन बाहेर पडणे सुद्धा जवळपास अशक्यच होते.

त्यांनी काल एका रात्रीत बाहेर जायचे सगळे दरवाजे बंद केलेत. - मोनिका साखळ्या, दरवाजा खिडक्या एकामागोमाग एक चेक करत म्हणाली.

मॉन्स्ट्रोसिटीNơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ