मॉन्स्ट्रोसिटी - भाग 9

72 0 1
                                    

बाईक दरीत कोसळल्याचा आवाज बहुतेक त्या भुतावळीच्या शेवटच्या सहकाऱ्याला ऐकु गेला असावा. त्या आकृतीने आवाजाच्या दिशेने आपली बाईक वळवली. मोनिका आणि सोफियावर आलेल्या सध्याच्या परिस्थीतीत इथुन बाहेर पडायचे तर बाईक पाहिजेच होती. त्यातली एक मघाशीच दरीत गायब झाली. त्यामुळे आता शेवटचा एकच पर्याय त्यांच्याकडे राहिला होता. एव्हाना तीनही भुतावळींपैकी दोन कायमचे गारद झाले होते. शेवटची आकृती बाईकवरुन त्या दोघींचा शोध अजुनही घेतच होती.

एव्हाना उजाडत आले होते. बर्फाच्या गालिचात दुरवर पसरलेला अंधार हळुहळु कमी होत चाललेला. बर्फ पांढराशुभ्र दिसु लागला. दुरवरुन फक्त बाईकचा आवाज येऊ लागला. सोफिया आणि मोनिका दोघीही झुडुपात दबा धरुन बसलेल्या. कानोसा घेत ती आकृती बाईक वरुन कोणत्या दिशेला फिरतेय याचा अंदाज घेऊ लागल्या. बाईक चा आवाज त्यांच्यापासून दुर जाऊ लागला. तशी मोनिकाने सोफियाच्या कानात काहीतरी कुजबुज केली. दोघीही वेगवेगळ्या दिशेने चालु लागल्या.

मोनिका तशीच सरळ एका रेषेत चालत थोडी दुरवर खुल्या मैदानात आली.

कुणी आहे का? please somebody help me..!!
- मोनिका जोराने ओरडत पुढे जाऊ लागली.

Please, somebody help me..
कुणीतरी वाचवा मला..sss... - मोनिका काहीवेळ चालून पुन्हा ओरडली.

तिचे ओरडणे आजुबाजुच्या मोकळ्या वातावरणात गुंजताच त्या भुतावळीच्या बाईकचा आवाज जवळ येऊ लागला. मोनिका तरीही जोरजोराने ओरडतच राहिली. आता ती भुतावळ बाईकवरुन भयानक वेगाने तिच्यापर्यंत पोहचणारच होती. फक्त दहा पावलांचे अंतर राहिले असावे, तितक्यात जवळच्या झुडुपात लपलेल्या सोफियाने अचानक बाहेर येत आपल्याजवळच्या धारधार सळीने त्या भुतावळीला एकच अचुक फटका मारला. ती बिभत्स आकृती अचानक झालेल्या हमल्याने बाईकवरुन उडुन खाली पडली. सोफिया ने पळत जाऊन पुन्हा त्याच्या शरीराचे चिथडे उडवु लागली. अंगावर अक्षरश: काटा येईल असे आवाज आणि किंचाळ्यानी संपुर्ण वातावरणात दणाणुन गेले.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jun 10 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मॉन्स्ट्रोसिटीWhere stories live. Discover now