माझं नाव समीर, बॅचलर आहे, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं वय सध्या २६ आहे, मी जिम मध्ये वगेरे जात नाही कारण मी घराबाहेरच मी माझी स्वतःची छोटीशी जिम केली आहे, त्यामुळे माझी शरीरयष्टी एकदम परफेक्ट अशी आहे, मी एक छोटं माझ्यापुरती घर विकत घेतलं शहरापासून काही दूर, शहरात बघायला गेलं तर हल्ली किंमत किती वाढलीये तुम्हाला माहितीच आहे असे माझे ५, ६ घरं बांधून होतील, शहरात घर बघायला गेलो तर..
माझी कंपनी मध्ये ड्यूटी ही सकाळी नऊ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असते, मला जेवण बनवायचा, भांडी कपडे वगैरे धुवायला अजिबात आवडत नाही, थोडक्यात मला करण्यात कंटाळा येतो,
तर नुकताच एक दिवस झाला होते मला तिथे येऊन, संध्याकाळी मी कामावरून येत असताना, समोरच्या घरातून एक बाई बाहेर पडत होती तिच्या एकंत्रित पेहरावावरून ती कामवालीच वाटत होती, पण ती दिसायला अजिबात तशी दिसत नव्हती..
ती गेट मधून बाहेर पडत असताना मी तिला विचारलं..अहो ऐका ना..
तिने पलटत माझ्याकडे पाहिले..
मी - मी इथे नवीन आहे, कालच राहिला आलोय, कुणी कामवाली मिळेल का इथे..
ती - अहो कुणी काय मीच कामं करते, इकडे ह्या बाजूला शिल्पा वहिनीकडे ही मी धुणीभांडी करते.
मी - अहो तुम्हाला जमेल का, कारण मला जेवण येत नाही, आणि भांडी, कपडे, धुण्याचा पूर्ण कंटाळा येतो..
ती - हा चालेल, कधी पासून येऊ..
मी - उद्या पासून याल? आणि मी सकाळी नऊ वाजता जातो तो संध्याकाळी ५ वाजता ह्या वक्ताला येतो, तू ह्या वक्ताला जरी आलीस तरी काही हरकत नाही, सकाळचे माझे कपडे असतील काही आणि मला जेवण रात्री साठी करून जा मग.. येवढंच काम असेल तुला माझ्याकडे..
ती - चालेल.. उद्या येते..
तिने आणि मी तिचा पगार ठरवला आणि ती निघून गेली.
पुढच्या दिवशी कामावरून आलो तेव्हा, ती घरा बाहेरच उभी होती..